Amit Shah DIO
मुंबई/पुणे

Pune News: गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर, दिवसभर विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी

Traffic Diversions in Pune as Amit Shah Attends Multiple Events : प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा-२ सन २०२४-२५ अंतर्गत आज शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री उपस्थित असतील.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Amit Shah to Chair Western Zonal Council Meeting in Pune Today : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे पुण्यात आगमन झाले. आज ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. ⁠गृहमंत्री अमित शहा यांच्या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत. पुण्यातील अमित शहांच्या कार्यक्रमांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ?

सकाळी आकरा वाजता कोरेगाव पार्क परीसरातील हॅाटेल वेस्टीन येथे पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गुजरात, गोवा, महाराष्ट्र या राज्यांच्या आणि दादरा नगर हवेली तसेच दिव दमन या केंद्र शासित प्रदेशातील प्रतिनिधींची सुरक्षा विषयक बैठक होणार आहे.

⁠दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. ⁠त्यानंतर पाच वाजता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम आणि निधीचे वितरण कार्यक्रम शहा यांच्या हस्ते होणार आहेत.

अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमसह इतर दोन ठिकाणी त्यांचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

१) विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे.

२) मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून इच्छितस्थळी जावे.

३) पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून बाणेर रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे अथवा पुणे विद्यापीठ चौकातून औंध रोड मार्गे जावे.

जड, अवजड वाहनांना बंदी...

१) पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक- पाषाण रोड

२) पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक- बाणेर रोड

३) पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल - औंध रोड या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार

जड वाहनांना शहरात २४ तास बंदी..

शनिवार (दि. २२) मध्यरात्री १२ ते रविवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहरात सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना तसेच मिक्सर, डंपर, हायवा व स्लो मूव्हिंग (जेसीबी, रोड रोलर) वाहनांना सर्व रस्त्यांवर बंदी घालण्यात आली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT