Ulhasnagar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar : "तेरे को पहले ही बोला..." भररस्त्यात तरुणावर चाकूने सपासप वार, उल्हासनगरमध्ये खळबळ

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी दगड आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • उल्हासनगरमध्ये जुन्या वादातून तरुणावर दगड आणि चाकूने जीवघेणा हल्ला

  • तरुणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

  • संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  • दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

अजय दुधाने, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तींनी दगड आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे .या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन माखिजा हे गुरुवारी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मित्र समाधान उत्तम बागुल यांना भेटण्यासाठी अंबिका अपार्टमेंट आणि सेवन स्टार बिल्डिंगमधील गल्लीत उभे होते. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती अचानक तेथे आले आणि त्यांनी माखिजा यांच्यावर हल्ला केला.

हल्लेखोरांनी “तेरे को पहले ही बोला था ना कि अमित भाई के साथ जो कुछ भी है वो खतम कर… तू पिछली बार बच गया, इस बार नही बचेगा” अशी धमकी देत अमित वाधवासोबत असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून हल्ला केला. त्यातील एका आरोपीने हातातील दगडाने माखिजा यांच्या डोक्यावर हल्ला केला.

दरम्यान, जखमी अवस्थेत माखिजा तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या आरोपीने त्याच्या हातातील चाकूने त्यांच्या पाठीवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेत माखिजा जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT