Youths Threw Beer Bottles At Hotel Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar News: मोफत बिअर दिली नाही म्हणून तरुणांनी केला राडा, हॉटेलवर दगडफेक करत फेकल्या बिअरच्या बाटल्या; CCTV आला समोर

Youths Threw Beer Bottles At Hotel: मोफत बिअर दिली नाही म्हणून संतप्त होत तरुणाने आपल्या मित्रांसोबत हॉटेलवर बिअरच्या बॉटल्स फोडल्या आणि दगडफेक केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

अजय दुधाणे, बदलापूर

मोफत बिअर देण्यास हॉटेल मालकाने नकार दिल्यामुळे तरुणाने जोरदार राडा केला. संतप्त तरुणाने हॉटेलवर दगडफेक करत बिअरच्या देखील बाटल्या फेकल्या. ऐवढ्यावर न थांबता तरुणाने हॉटेल मालकाला देखील मारहाण केली. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात उल्हासनगर पोलिसांनी (Ulhasnagar Police) गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प १ मध्ये स्थानिक गुंड आणि त्याच्या साथिदारांनी अवताराम चौकात असलेल्या हिमालय रेस्टॉरंट अँड बारमध्ये मोफत बिअर आणि चाखन्याची मागणी केली. पण हॉटेल मालकाने मोफत बिअर आणि चखना देण्यास नकार दिल्याने त्यांनी हॉटेलवर मोठ्या प्रमाणात बिअरच्या बाटल्या फेकल्या. एवढेच नाही तर उल्हासनगर हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष असलेले हॉटेल मालक नानिक आहुजा यांनाही मारहाण केली.

स्थानिक व्यावसायिकांसोबत अनेकदा गुंडगिरी करणारा राजू सरदार मंगळवारी रात्री १२.१५ वाजता त्याच्या तीन साथीदारांसह हिमालय हॉटेलमध्ये आला होता. यावेळी राजू मोफतची बिअर आणि चाखन्याची मागणी करू लागला. पण त्याला फुकटामध्ये बिअर न मिळाल्यामुळे तो संतप्त झाला. त्यानंतर राजू आणि त्याच्या मित्रांनी हॉटेलवर बिअरच्या बाटल्या फेकल्या. ऐवढ्यावर न थांबता त्यांनी हॉटेलवर दगडफेक देखील केली आणि हॉटेल मालकाला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हॉटेल मालक नानिक आहुजा यांनी याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात धाव घेत राजू सरदार आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे आयोजन

Raigad Politics : रायगडच्या वादाचा दुसरा अंक; राष्ट्रवादी भाजपमध्ये सुप्त संघर्ष

Ind Vs Eng : भारताच्या ऐतिहासिक विजयात अडथळा, इंग्लंडच्या मदतीला पाऊस धावला; गिलसेना पराक्रम करणार का?

SCROLL FOR NEXT