Ulhasnagar News BJP Chandrashekhar Bawankule statement on Maratha reservation CM Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: आरक्षण कधी मिळेल, हे मुख्यमंत्री शिंदेच सांगू शकतील; चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान

Chandrashekhar Bawankule News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच सांगू शकतील आरक्षण कधी मिळेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

अजय दुधाने

Chandrashekhar Bawankule on Maratha reservation

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या काळात सुप्रीम कोर्टात बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण गेलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच सांगू शकतील आरक्षण कधी मिळेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बावनकुळे रविवारी उल्हासनगर दौऱ्यावर आले होते. संपर्क ते समर्थन या भाजपाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी उल्हासनगरच्या मार्केटमधील प्रत्येक दुकानात जाऊन नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपलं मत विचारलं. (Latest Marathi News)

२०२४ मध्ये आपल्याला कोणते पंतप्रधान पाहिजे, असा प्रश्न बावनकुळे यांनी नागरिकांना विचारला. यावर सर्वच दुकानदारांनी आमची पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहिल, असं उत्तर दिलं. दरम्यान, या कार्यक्रमानंतर बावनकुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयांवर उत्तर देताना महत्वाचं विधान केलं. राज्यात भाजप सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टात ते टिकवता आलं नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच सांगू शकतील आरक्षण कधी मिळेल, असं वक्तव्य देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देऊन शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

यावर देखील बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. राजीनामा द्यायचा की ठेवायचा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे मर्द मराठा मुख्यमंत्री आहे. त्यांनी आरक्षण देण्याचा संकल्प केला आहे, ते आरक्षण देतील, असंही बावकुळे म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेनेत जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती घेतलं धनुष्यबाण

Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

SCROLL FOR NEXT