Manoj Jarange Patil: '30 - 31 तारखेपर्यंत वाट पाहू नंतर..', जरांगे पाटीलांचा सरकारला गंभीर इशारा

Maratha Reservation: '30 - 31 तारखेपर्यंत वाट पाहू नंतर..', जरांगे पाटीलांचा सरकारला गंभीर इशारा
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsaam Tv

Manoj Jarange Patil On Maratha Reservation:

मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की, ''माझं ह्रदय बंद पडलं, तर या सरकराचंही ह्रदय बंद पडणार.'' 30 - 31 तारखेपर्यंत वाट पाहू, त्यानंतर राज्य सरकारला धडा शिकवू, असा हल्लाबोल ही जरांगे पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मनोज जरांगे म्हणाले की, ''मला काही झालं तरी माझा मराठा समाज आंदोलन करणार आहे. मात्र मला काही होणार नाही. डॉक्टर जरी म्हणत असले की हृदयाचे आजार होईल. माझं ह्रदय बंद पडलं तर सरकारचंही ह्रदय बंद पडेल.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Shinde Group MP Resign : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा धक्का; मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा, पत्र व्हायरल

ते म्हणाले, ''सरकारचं काही संवाद किंवा उत्तर नाही. आणखी दोन-तीन दिवस म्हणजे 30 - 31 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यांना माणुसकी समजत नसेल तर मराठा समाज उत्तर देईल.'' (Latest Marathi News)

'बोलता येतंय तोपर्यंत चर्चेसाठी या'

जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) म्हणाले, ''मला बोलता येतेय, तोपर्यंत चर्चेला या. नंतर येऊन उपयोग नाही.'' ते म्हणाले, ''माझे कुटुंब माझ्यासमोर आणू नका, कुटुबांला पाहिलं की हुंदका भरुन येतो, माणूस दोन पावले मागे येतो.'' ते पुढे म्हणाले, ''मी कुटुंबाला मानत नाही, प्रथम समाजाचा नंतर कुटुंबांचा, जगलो तर तुमचा मेलो तर समाजाचा असे म्हणत तुमचा पोरगा गेला तर रडायचं नाही, पुढे पुढे बघा किती भयानक आंदोलन होईल.''

Manoj Jarange Patil
Maratha Aarakshan : 'मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावं', राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलं निवेदन

'आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेणार'

दरम्यान, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी आहे. जीव हा महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतचीही जे लोक आहेत, त्यांनीही त्यांची काजी घेणं गरजेचं आहे. स्वतः मुख्यमंत्री यांनी या विषयात लक्ष घातलं असून जे योग्य निर्णय आहे, ते झाले पाहिजे, असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुरु आहे. जरांगे यांनीही मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला पाहिजे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com