मोबाईल चोरण्याची नवीन पद्धत CCTV मध्ये कैद!
मोबाईल चोरण्याची नवीन पद्धत CCTV मध्ये कैद! SaamTvNews
मुंबई/पुणे

VIDEO : मोबाईल चोरण्याची नवीन पद्धत CCTV मध्ये कैद!

अजय दुधाणे

उल्हासनगर : मोबाईल हिसकावून चोरण्याच्या घटना नवीन नाहीत. मोबाईल तसेच मंगळसूत्र हिसकावणारे चोर शक्यतो दुचाकीच्या (Bike) माध्यमातून गुन्हे करतात हे आज पर्यंत आपण पाहिले व ऐकले आहे. मोबाईलवर बोलत चाललेल्या एका व्यक्तीच्या हातातील मोबाईल, त्याच्या पाठीमागून येणाऱ्या रिक्षातील (Rickshaw) चोरट्याने हिसकावून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला असून हि घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

मात्र, उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक मोबाईल हिसकावण्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन भागात असलेल्या गणेश नगर या वस्तीत एक व्यक्ती रस्त्यावर मोबाईलवर (Mobile) बोलत जात असताना, त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा मधून एका व्यक्तीने रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावला.

मोबाईल हिसकावल्यानंतर मोबाईल मालक व्यक्ती सदर रिक्षा मागे पळाला. मात्र रिक्षा चालकाने रिक्षा जोरात पळवल्याने रिक्षातील चोरांनी (Thieves) मोबाईल चोरून पळ काढला. या घटनेमुळे मोबाईल चोरण्याची नवीनपद्धत सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Metro: वंदे भारत मेट्रोचा फस्ट लूक व्हायरल; लवकरच प्रवाशांच्या सेवेत, पाहा VIDEO

Mumbai Indians mistakes : हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचं यंदा चुकलं तरी कुठं? नेमक्या गोष्टी समजून घ्या!, VIDEO

Narendra Modi Sabha: राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही पाकिस्तानची इच्छा; झारखंडच्या सभेत मोदी कडाडले

Today's Marathi News Live : राहुल गांधींचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र; रेवण्णा प्रकरणातील आरोपींवर कारवाईची मागणी

Fashion Tips: जड कानातले घातल्यानंतर तुमचेही कान दुखतात? मग या टीप्स ट्राय तर करा.

SCROLL FOR NEXT