Mahesh Gaikwad On Ganpat Gaikwad Saam Tv
मुंबई/पुणे

Mahesh Gaikwad: 'गणपत गायकवाड अडचणी निर्माण करत होते', गोळीबारातून बचावलेल्या महेश गायकवाड यांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Ulhasnagar Firing Case: महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. मात्र यातून ते बचावले गेले.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Mahesh Gaikwad On Ganpat Gaikwad:

महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. मात्र यातून ते बचावले गेले असून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्यात आणि गणपत गायकवाड यांच्यात नेमकं काय झालं होतं, याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

गोळीबाराच्या घटनेबद्दल सांगताना महेश गायकवाड म्हणाले आहेत की, ''कल्याण पूर्व येथील विविध समस्यांचा पाठपुरावा मी करत होतो. प्रत्येक वेळेला आमदार गणपत गायकवाड अडचणी निर्माण करत होते. सामाजिक कामात नव्हे तर, माझ्या व्यवसायात देखील त्यांनी माझ्या भागीदारांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना सगळा प्रकार सांगितला होता. प्रत्येक वेळी त्यांनी माझी समजूत काढली, युतीत आहे,असं सांगण्यात आलं.''  (Latest Marathi News)

'म्हणून माझ्यावर गोळ्या झाडल्या'

महेश गायकवाड म्हणाले, ''शेतकऱ्यांवर अन्याय झाला. मी विरोध केला म्हणून माझ्यावर गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड 2019 मध्ये संधी साधून भाजपमध्ये आले, ते भाजपचे कार्यकर्ता नाहीत. भाजपचे हे संस्कार नाही. माझा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. आमदार गणपत गायकवाड यांना कठोर शिक्षा मिळेल. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.''

गोरगरीब आणि आईच्या आशीर्वादाने घरी परतलो...

ते म्हणाले, ''माझ्या आईचे ,गोरगरिबांचे आशीर्वाद व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे आज मी तुमच्यासमोर उभा आहे. इथून पुढे आणखी जोमाने समाजसेवा करेन.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

Solapur Politics: उत्तम जानकरांनी खूप त्रास दिला, खोटे गुन्हे दाखल केले; मोहिते पाटील यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT