Ulhasnagar Prostitution Racket  Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar: भाड्याच्या घरात देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी अचानक धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Ulhasnagar Prostitution Racket: उल्हासनगर पोलिसांनी मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला. एका घरावर छापा टाकत तिघांना अटके केली.

Priya More
  1. उल्हासनगरमध्ये भाड्याच्या घरात देहविक्रीचा व्ययवसाय

  2. पोलिसांनी छापा टाकत तिघांना केली अटक

  3. उल्हासनगर कॅम्प ४ मधील घटना

  4. देहविक्रीच्या रॅकेटमधून दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली

अजय दुधाणे, उल्हासनगर

उल्हासनगर पोलिसांनी देहविक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली. एका भाड्याच्या घरामध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली. यावेळी पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरूषाला रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. या कारवाईची उल्हासनगरमध्ये चर्चा होत आहे.

उल्हासनगर कॅम्प-४ मध्ये भाड्याच्या घरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्याचा ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली. जादा पैशांचे आमिष दाखवून महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित महिलांना सुरक्षेच्या दृष्टीने सुधारगृहात पाठवण्यात आले. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर पोलिसांनी सांगितले की, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली. या महिलांना देहविक्रीचा व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिला आणि एक पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. विठ्ठलवाडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या देहविक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सहभागी आहे याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT