Ulhasnagar Crime Saam TV
मुंबई/पुणे

VIDEO : बुद्धविहारातून बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती चोरली; घटना CCTVत कैद, ग्रामस्थांकडून संताप

बुद्धविहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पंचधातूची मूर्ती चोरून नेण्यात आली आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरांमध्ये चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. या चोरट्यांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. अशातच, उल्हासनगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरातील बुद्धविहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पंचधातूची मूर्ती चोरून नेण्यात आली आहे. मूर्ती चोरून नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील ओटी सेक्शनमधील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जेतवन बुद्धविहार आहे. या बुद्धविहारात भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पंचधातूची १ फुटाची मूर्ती होती. ही मूर्ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

परिसरातील महिला बुद्धविहारात साफसफाई करण्यासाठी आल्यानंतर त्यांना मूर्ती जागेवर नसल्याचं दिसलं आणि मूर्ती चोरीला गेल्याचं समोर आलं. यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (Viral Video) चेक केलं असता त्यात एक चोरटा एका गोणीत भरून ही मूर्ती नेत असल्याचं समोर आलं.

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्याला लवकरात लवकर शोधून मूर्ती परत मिळवली नाही, तर आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. त्यामुळे या चोरट्याला शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

SCROLL FOR NEXT