Ulhasnagar Crime News अजय दुधाणे
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime: युनियन बँकेच्या ATMमधून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न फसला; आरोपीला रंगेहाथ अटक

Ulhasnagar Crime News: ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी अखिलेश पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरच्या युनियन बँकेच्या एटीएममधून पैसे चोरी करतांना एका चोराला (Thief) पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रंगेहाथ अटक केली आहे. कॅम्प नंबर ३ परिसरात जवाहर हॉटेल समोरील युनियन बँकेच्या एटीएममध्ये हा चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. (Ulhasnagar Latest News)

मिळालेल्या माहीतीनुसार, उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प नंबर ३ परिसरात जवाहर हॉटेल समोर युनियन बँकेचं एटीएम आहे. ५ ऑक्टोबरच्या रात्री आरोपी अखिलेश पटेल हा एटीएममध्ये स्टीलची पट्टी घालून असेम्बलीमधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याठिकाणी असलेल्या निवृत्ती पाटणे यांनी एटीएममध्ये अखिलेश याची हरकत पाहता तात्काळ मध्यवर्ती पोलिसांना याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून आरोपी अखिलेश पटेल याला ताब्यात घेत अटक केली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी अखिलेश पटेल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधर्म सावंत हे करत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Bedroom Vastu Tips: बेडरूममध्ये आरसा ठेवावा की नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?

SCROLL FOR NEXT