Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

Shruti Vilas Kadam

सिल्व्हर गाऊनमध्ये शिवालीचा ग्लॅमरस अंदाज

शिवालीने फोटोशूटसाठी चमकदार सिल्व्हर रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे. या आउटफिटमुळे तिचा लूक आकर्षक आणि स्टायलिश दिसत आहे.

Shivali Parab

बॅकलेस डिझाइनने वेधले लक्ष

या गाऊनचे बॅकलेस डिझाइन विशेष लक्षवेधी ठरले आहे. गाऊनवरील सिक्विन वर्कमुळे तिच्या लूकला बोल्ड आणि रॉयल टच मिळाला आहे.

Shivali Parab

हटके ज्वेलरीची निवड

गाऊनसोबत शिवालीने गळ्यात डिझायनर चोकर आणि हातात स्टायलिश ज्वेलरी परिधान केली आहे. या अॅक्सेसरीजमुळे तिचा लूक आणखी खुलून दिसत आहे.

Shivali Parab

कुरळ्या केसांची आकर्षक हेअरस्टाइल

शिवालीने या फोटोशूटसाठी केसांना आकर्षक कर्ल्स दिले आहेत. तिच्या हेअरस्टाइलने संपूर्ण ग्लॅमरस लूकला परफेक्ट फिनिश मिळाला आहे.

Shivali Parab

खास कॅप्शननेही वेधले लक्ष

फोटो शेअर करताना शिवालीने ‘Her lips have made me her prisoner’ असे लक्षवेधी कॅप्शन लिहिले आहे. तिच्या या कॅप्शनचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Shivali Parab

फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा पाऊस

शिवालीचे हे सिल्व्हर गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून तिच्या ग्लॅमरस अंदाजाचे कौतुक केले जात आहे.

Shivali Parab

अभिनयासोबत फॅशनचीही चर्चा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून लोकप्रिय झालेल्या शिवालीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता तिच्या या स्टायलिश फोटोशूटमुळे तिच्या फॅशन सेन्सचीही चर्चा रंगली आहे.

Shivali Parab

Horoscope: पुढील 30 दिवस 'या' 8 राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

Horoscope | Saam Tv
येथे क्लिक करा