Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, घरातील प्रत्येक वस्तुंच्या मांडणीविषयी नियम सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये आरसा ठेवावा की नाही? त्याचे नियम जाणून घ्या.
अनेकजण आपल्या आवडीप्रमाणे बेडरूम सजावटीमध्ये डिझायनर आरसे किंवा ड्रेसिंग टेबल लावतात. पण वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा ठेवताना त्याची दिशा आणि जागा अत्यंत महत्वाची मानली जाते.
बेडरूममध्ये आरसा चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या ठिकाणी लावला तर आरोग्यावर आणि वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा ठेवणे योग्य आहे. पण तो कुठे आणि कसा लावला आहे हे अत्यंत महत्त्वाचे असते. जर आरशाची योग्य काळजी घेतली नाही, तर तो घरात नकारात्मकता वाढवू शकतो.
तुम्ही झोपताना बेडवर असताना तुमची प्रतिमाआरसात दिसता कामा नये. झोपेत असताना आरसा शरीराची ऊर्जा शोषून घेतो, ज्यामुळे सतत थकवा, ताण येतो.
बेडरुममधील आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा. या दिशेला आरसा लावल्याने संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
बेडरूममध्ये कधीही तडा गेलेला, धुसर किंवा तुटलेला आरसा ठेवू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.