Manasvi Choudhary
अनेकजण सकाळची सुरूवात लिंबू पाणी किंवा कोमट पाणी पिऊन करतात. ही दोन्ही पाणी शरीरासाठी फायदेशीर मानली जातात.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी लिंबू पाणी किंवा कोमट पाणी पिऊ शकतात का? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते
कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते ज्यांना बद्धकोष्ठता, पोट साफ न होण्याचा त्रास आहे त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या.
कोमट पाण्यात शून्य कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कोमट पाणी पिणे महत्वाचे आहे
लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला चमकपणा देते.
लिंबूमध्ये फायबर असते, जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.