Kalyan-Nagar Highway Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: कल्याण-नगर महामार्गावर अपघाताचा थरार, ट्रकच्या चाकाखाली चिरडून २ जिवलग मित्रांचा मृत्यू

Kalyan-Nagar Highway Accident: कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दोन तरुणांना चिरडलं. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Priya More
  • कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात

  • दोन मित्रांचा जागीच मृत्यू

  • ट्रकच्या चाकाखाली चिरडून झाला मृत्यू

  • ओव्हरटेक करताना घडली घटना

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली येऊन २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण मित्राला भेटण्यासाठी निघाले होते. पण मित्राला भेटण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. हे दोन्ही तरुण जिवलग मित्र होते. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण- नगर महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दुचाकी थेट ट्रकच्या मागील चाकाखाली गेली आणि या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

राजू गुप्ता आणि पवन गुप्ता अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे होती. हे दोघे पहाटे सुमारे ४ वाजताच्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी वरप परिसराकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी कल्याण- नगर महामार्गावर एका ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले आणि ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघेही उल्हासनगरचे रहिवाशी असून त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. टिटवाळा पोलिस या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

साताऱ्यात भीषण अपघातामध्ये महिलेचा मृत्यू

सातारा रहिमतपूर रस्त्यावर एका कारला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार उलटली. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

Mumbai Metro One : मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक निर्णय! आता व्हॉट्सॲपवर मिनिटांत मिळणार पास; जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT