भरधाव ट्रक उलटला, १० मुलांसह १८ जणांचा जागीच मृत्यू; महामार्गावर रक्ताचा सडा

Afghanistan Truck Accident 18 Dead 10 Children Killed: अफगाणिस्तानमध्ये भीषण ट्रक अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १० लहान मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानमधून परतणाऱ्या कुटुंबांना घेऊन जाणारा ट्रक काबुल-जलालाबाद महामार्गावर पलटला. २९ जण जखमी असून बचावकार्य सुरू आहे.
Rescue teams and locals gather at the site after a truck carrying migrant families overturned on the Kabul–Jalalabad highway, leaving 18 dead.
Rescue teams and locals gather at the site after a truck carrying migrant families overturned on the Kabul–Jalalabad highway, leaving 18 dead.saam tv
Published On

अफगाणिस्तानमधून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमधून परतणाऱ्या कुटुंबांना घेऊन जाणारा एक ट्रक शनिवारी पलटल्याने भीषण अपघात झाला. पाकिस्तानमध्ये स्थलांतरिताबाबत धोरणे कडक झाल्यानंतर हजारो अफगाण नागरिक आपल्या देशात परतत आहेत. याच पार्श्वभूमीवर पूर्व अफगाणिस्तानमधील जलालाबाद आणि काबुलदरम्यानच्या मार्गावर हा अपघात घडला. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 10 लहान मुलांचा समावेश आहे. तर 29 जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने मृत आणि जखमींच्या आकड्याची पुष्टी केली असून तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

Rescue teams and locals gather at the site after a truck carrying migrant families overturned on the Kabul–Jalalabad highway, leaving 18 dead.
महाराष्ट्र ते दिल्ली काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट सात राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

मृतांमध्ये 10 मुलांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण 18 जणांचा मृत्यू झाला. मृतानामध्ये 10 मुले, 5 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. जखमी झालेल्या 29 जणांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रकमध्ये अनेक कुटुंबे एकत्र प्रवास करत होती आणि त्यांच्यासोबत घरगुती समानही होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गोंधळाची परिस्थिति निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मदत केली.

पाकिस्तानमधून परतत होती कुटुंबे

प्रशासनाच्या माहितीनुसार, हा ट्रक त्या अफगाण कुटुंबांना घेऊन जात होता जे अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये राहत होते आणि आता आपल्या देशात परतत होते. अलीकडेच पाकिस्तानने अफगाण लोकांविषयी कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक अफगाणिस्तानात परतत आहे.

Rescue teams and locals gather at the site after a truck carrying migrant families overturned on the Kabul–Jalalabad highway, leaving 18 dead.
प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

अफगाणिस्तानात रस्ते अपघात गंभीर समस्या

अफगाणिस्तानात रस्ते अपघात ही मागच्या काही दिवसांपासून गंभीर समस्या आहे. अनेक दशकांच्या संघर्षामुळे अनेक भागांतील रस्ते व्यवस्था कमकुवत झाली आहे. याशिवाय धोकादायक वाहनचालक, वाहनांची खराब स्थिती आणि वाहतूक नियमांचे अपुरे पालन ही अपघातांची प्रमुख कारणे मानली जातात. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पश्चिम अफगाणिस्तानात इराणमधून परतणाऱ्या स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत ७८ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये १९ मुलांचा समावेश होता. आता झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com