UGC Saam Tv
मुंबई/पुणे

UGC: आता फक्त अडीच वर्षात डिग्री मिळणार, युजीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

UGC Descision Of Degree: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूजीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही तीन वर्षांची डिग्री अडीच वर्षात प्राप्त करु शकणार आहेत.

Siddhi Hande

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेत काही बदल केले जातात. शैक्षणिक धोरणानुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीचा मसुदा जाहीर केली आहे. या नियमावलीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना तीन वर्षांची डिग्री अडीच वर्षात मिळवता येणार आहे. (UGC)

विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. तीन वर्षांची डिग्री अडीच वर्षात मिळवली. चार वर्षांची ऑनर्स डिग्री तीन वर्षात मिळणार आहे. याचसोबत तुम्ही एका वर्षात कॉलेजला दोनदा अॅडमिशन घेऊ शकणार आहात. याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

यूजीसीने जारी केलेल्या नियमावलीनुसार, एक्सलेटेड डिग्री प्रोग्रामअंतर्गत तीन वर्षांची डिग्री पाच सत्रांमध्ये घेतली जाईल तर चार वर्षांची डिग्री सहा किंवा सात सत्रांमध्ये घेण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला आता डिग्री मिळवण्यासाठी सहा महिने कमी कालावधी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कमीत कमी कालावधीत डिग्री मिळणार आहे. विद्यार्थ्यांना या डिग्रीसाठी आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. (Degree Time Decreases)

याचसोबत डिग्री मिळवण्यासाठी कमी झालेल्या कालावधीतच क्रेडिटदेखील मिळवणे आवश्यक आहे.एक्स्टेडेड डिग्री प्रोग्रामअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीचा कालावधी वाढवता येार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अडीच आणि साडेतीन वर्षात पदवी मिळवता येणार आहे.

२० टक्के कोर्स आणि अप्रेंटिसशिपला (50 percent for apprenticeship)

विद्यार्थ्यांना पदवी मिळवण्यासाठी ५० टक्के हे अभ्यासक्रमाला द्यावे लागणार आहेत. तर ५० टक्के क्रेडिट आणि अप्रेंटिसशिपला द्यावे लागणार आहेत.

विद्यापीठांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना दोन वेळा प्रवेश दिला जाणार आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardiac Arrest First Aid: घरात कुणी अचानक बेशुद्ध पडलं तर काय कराल? पहिल्या ५ मिनिटांत करा हे ७ उपाय

Health Checkup30s: वयाच्या तिशीत येताय? या टेस्ट करा, संकट येण्याआधीच लागेल चाहूल

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

ICC Player of the Month: आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारावर टीम इंडियाची छाप; शुभमन गिल आणि शेफाली वर्माची निवड

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

SCROLL FOR NEXT