Maharashtra News : आमदारांचा शपथविधी कधी? मुंबईत विशेष अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवडही होणार

Maharashtra vidhan sabha assembly session : भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यानंतर आता विशेष अधिवेशनाचे वेध लागलेत. उद्या मुंबईमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेय. तीन दिवस विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.
Maharashtra vidhan sabha assembly session
Maharashtra vidhan sabha assembly sessionSaam Tv
Published On

Maharashtra vidhan sabha assembly session Mumbai : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, अजित पवार यांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यानंतर आता विशेष अधिवेशनाचे वेध लागलेत. उद्या मुंबईमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेय. त्यामध्ये आमदारांना गोपनियतेची शपथ दिली जाणार आहे. त्याशिवाय विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अधिवेशनासंदर्भात माहिती दिली. राज्यपालांना तसं पत्र दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. (New Maharashtra assembly's special session to start from Dec 7; MLAs oath, speaker election on agenda)

आमदारांचा शपथविधी अन् राज्यपालांचे अभिभाषण

मुंबईमध्ये ७, ८ आणि ९ तारखेला आमदारांचे शपथविधी होण्याची शक्यता आहे. १६ तारखेपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार गेला जाणार आहे. त्याआधी अधिवेशनात आमदारांचे शपथविधी होणार आहेत. उद्या पासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. सोमवारी ९ डिसेंबर रोजी राज्यपालांनी अभिभाषण करावे, मंत्रिमंडळाने याबाबात राज्यपाल यांना निवेदन पाठवले आहे.

Maharashtra vidhan sabha assembly session
Weather Update : आज पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, कमाल अन् किमान तापमानात वाढ

नागपुरात हिवाळी अधिवेशानात 'इव्हेंट मॅनेजमेंट'चा तडका -

नवं नियुक्त सरकारच्या मंत्र्यांचा स्वागतासाठी हिवाळी अधिवेशनात 'इव्हेंट मॅनेजमेंट'चा तडका लागणार आहे. नऊवारी साडीतील तरुणी मंत्री आणि आमदारांचे स्वागत करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन एजन्सींना नियुक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचे आगमन होताच पारंपारिक नऊवारी साडी परिधान केलेल्या पाच महिला त्यांचे स्वागत करतील. दोन्ही सभागृहांच्या पिठाची अधिकाऱ्यांची अशाच पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. तसेच आमदार, मंत्री,अधिकारी यांच्या मदतीसाठी एजन्सीतर्फे एक कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे. प्रत्येक मंत्र्यांच्या कॉटेजवर एजन्सीचा एक कर्मचारी तैनात असेल. आमदारांच्या निवासस्थानी तसेच अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी कर्मचारी असेल.

Maharashtra vidhan sabha assembly session
Bank Rule: बँक ग्राहकांसाठी मोठा निर्णय; खात्यासोबत ४ वारसांची नोंद करता येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com