उध्दव ठाकरे यांचा उध्द्टपणा सहन करणार नाही; किरीट सोमय्यांचा घणाघात  Saam Tv
मुंबई/पुणे

उध्दव ठाकरे यांचा उध्द्टपणा सहन करणार नाही; किरीट सोमय्यांचा घणाघात

हसन मुश्रीफ मुळे मला अंबाआबाईच दर्शन घेत आलं नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातारा - भाजप नेते (BJP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कराड (Karad) मध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हसन मुश्रीफ यांच्या मुळे मला अंबाआबाईच दर्शन घेत आलं नाही. ठाकरे सरकारने नवीन इतिहास केला. घोटाळेबाजांऐवजी घोटाळे समोर आणणाऱ्यांना अटक करत आहेत. मला गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना विचारायचे आहे, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून पासुन वंचित ठेवलं?  ही ठाकरे सरकारची ठोकशाही त्यांनी मला गणेश विसर्जनापासून रोखले, अंबाबाईचे दर्शन घेऊ दिले नाही,  सीएसएमटी  स्टेशन बाहेर धक्काबुक्की केली.

मला ट्रेन मिळु नये म्हणून अर्धा तास अडवलं. मी विचारलं कोणत्या अधिकाराअंतर्गत मला रोखत आहात, त्यावर त्यांनी मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला. कॅापी मागितल्यावर दाखवलं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे. कऱ्हाडला माझ्या हातात दिलेल्या ॲार्डर मध्ये किरिट सोमय्याला घरात कोंडून ठेवा असे कुठेच नव्हते. असा आरोप त्यांनी यावेळी केला.

मग मुख्यमंत्री याची जबाबदारी स्विकारणार का ? आमच्या वैयक्तिक हक्कांवर गदा का? उद्धवजी तुम्ही हिरवा रंग धारण करा, मला विसर्जनापासून, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखता, उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार असे देखील ते यावेळी म्हणले. 

हे देखील पहा -

पुढे ते म्हणाले की, हसन मुश्रीफ हॅास्पिटल मध्ये आहेत. पण ॲार्डर मध्ये लिहिलंय की ते येणार आहेत. हसन मुश्रीफांच्या चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो.त्यांच्या स्वागतासाठी जनसमुदाय दाखल होणार आहे. ठाकरे सरकारने माजी सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने मला संरक्षण दिले, त्याच्याशीही तुमची गद्दारी. तुमच्याकडे जी माहिती आली गनिमी काव्याने किरीट सोमय्यांवर हल्ला होऊ शकतो, ही माहिती तुम्ही सुरक्षा यंत्रणांशी का शेअर केली नाही?उद्धव ठाकरेंची इच्छा आहे किरीट सोमय्यांवर हल्ला व्हावा, याचं उत्तर दिलीप वळसे पाटील यांना द्वावं लागेल.

मी २७००पानांची तक्रार केली आहे त्यावर चौकशी सुरु झाली आहे. आणखी माहिती ईडीने मागितली आहे, ती देखील माहिती दोन दिवसात देणार. ईडी आणि केंद्राने चौकशी सुरु केली आहे, या भितीने माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याची योजना होती का? हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले त्याचा हिशेब आपण का दिला नाही. शरद  शरद पवार साहेब ही तुमची व्यूवरचना आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढा. सरसेनापती घोरपडे कारखान्यात ९८ कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे २ कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे.हसन मुश्रीफ आणि परिवारानी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे.याची कागदपत्र मी उद्या ईडीकडे मुंबईत सुपुर्द करणार आहे. ब्रिक्स इंडीयाचे मालक मुश्रीफांचे जावई आहेत. यात ९८% शेअर हे एसयु कॅार्पोरेशन या शेल कंपनीचे आहे. गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार असे देखील किरीट सोमय्या यावेळी म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

SCROLL FOR NEXT