uddhav Thackeray and eknath shinde group saam tv
मुंबई/पुणे

Shinde Group Vs Thackeray Group : शिंदे गटाला मुंबईत मोठा धक्का! शिवसेनेचे पदाधिकारी पुन्हा ठाकरे गटात...

शिंदे गटाला मुंबईत मोठा धक्का! शिवसेनेचे पदाधिकारी पुन्हा ठाकरे गटात...

जयश्री मोरे

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मुंबईत शिवसेनेला (शिंदे गट) मोठा धक्का बसला आहे. मुंबईत मोठ्या संख्येने शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

शिंदे गटातील दक्षिण मध्य मुंबईचे शाखा क्रमांक १४२ चे शाखाप्रमुख हरिदास बंडगर व उपशाखाप्रमुख अशोक गांवकर, नितीश वायदंडे यांनी विभाग क्रमांक ९ चे विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. (Latest Marathi News)

विधानसभा संघटक भोसले, उपविभाग प्रमुख अरुण हुले, विधानसभा समन्वय सतीश काळगावकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी 'उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है' चे जोर जोरात नारे देऊन प्रवेश करण्यात आला.

दरम्यान, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी बंड करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं होतं. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

यातच शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळालं. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. असं सर्व असताना आता मुंबईत शिवसेनेला (शिंदे गट) गळती लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

SCROLL FOR NEXT