Raj Thackeray Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे जाणार राज ठाकरेंच्या घरी, तारीख ठरली?

Shiv Sena and MNS unity during Ganesh Chaturthi : गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यंदा शिवतीर्थवर गणपती दर्शनासाठी जाणार आहेत. याआधी मराठी मेळाव्यात आणि वाढदिवसानिमित्त अशी दोन वेळा भेट झाली होती, ही तिसरी भेट ठरणार आहे.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray to Visit Raj Thackeray’s Home : गणेशोत्सवाला उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गणेशोत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेटी वाढल्या आहेत. विजयी मेळाव्यात दोन्ही भाऊ एकाच स्टेजवर होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहचले होते. आता उद्धव ठाकरे पुढील पाऊल टाकणार आहेत. ते राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा असून दरवर्षी अनेक राजकीय नेते बाप्पाच्या दर्शनाला येत असतात. यावर्षी राज ठाकरे यांच्या बाप्पाचं तिसरं वर्ष असून आतापर्यंत पहिल्याच दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते दर्शनासाठी येत असतात. यावेळी उद्धव ठाकरे देखील बाप्पाच्या दर्शनाला येणार असल्याची माहिती आहे. (Ganesh festival brings Thackeray brothers together)

राज्यात 27 ऑगस्टला बाप्पाचं आगमन होणार आहे आणि याच मुहूर्तावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुढील भेट होणार असल्याची माहिती आहे. नुकतचं उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आतापर्यंत 5 जुलैच्या मराठी मेळाव्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची थेट भेट झाली आहे.

शिवसेना-मनसे युतीची चर्चा होणार?

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे एकत्र आले. भावांचे मनोमिलन झाल्यानंतर शिवसेना-मनसे पक्षाची युती होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दोन्ही भाऊ युतीसाठी सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. कार्यकर्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. दोन्ही नेत्यांमध्ये युतीच्या चर्चेला सुरूवात झाल्याची माहितीही मिळत आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होऊ शकतो. महाराष्ट्राच्या मनात आहे, ते होईल, असे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आलेय. त्यामुळे युती लवकरच होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये मतदार यादीत मोठा घोळ, भाजप नेत्याचं नावच गायब|VIDEO

Crime: लग्नाला नकार दिला, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडला संपवलं; प्रेमाचा भंयकर शेवट

विद्येच्या माहेरघरात जादूटोणा, शाळेत गोलाकार चिन्हात लिंबू, अंडी अन् कुंकू; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्याला कारने उडवलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

Pune News: राज्यातील डाळिंबाच्या बागा टार्गेट? पुण्यातील शेतातून तब्बल ४.५ हजार किलो डाळिंब चोरीला, सोलापुरातही तशीच घटना

SCROLL FOR NEXT