गिरीश कांबळे, मुंबई
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निर्णयाची चिरफाड करण्यासाठी ठाकरे गटाने आज मंगळवारी महापत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. नार्वेकरांनी निर्णय देत लोकशाहीचा गळा घोटाळ्याचा दावा करत नार्वेकरांना घेरण्यासाठी ठाकरेंनी चंग बांधला आहे. यासाठी आज मंगळवारी ठाकरे-कायदेपंडितांची नार्वेकरांच्या निकालावर खुल्या चर्चेचं आयोजन करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली चौकट झुगारून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर निकाल दिला आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता नार्वेकरांना घेरण्यासाठी ठाकरे गटांनं चंग बांधला आहे. त्यासाठी न्यायालयीन लढाई सोबतच जनतेच्या न्यायालयात जाण्यासाठी खास महापत्रकार परिषदेचं आयोजन ठाकरे गटानं केलं आहे.
नार्वेकरांनी दिलेला निर्णय ही लोकशाहीची हत्या असून या निर्णयाची जनतेच्या न्यायालयात चिरफाड करण्याचं ठाकरे गटाने ठरवलं आहे. यासाठी आज मंगळवारी वरळी डोममध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत 2013-2018 मधील पक्षांतर्गत निवडणुकांचे व्हिडिओ, कागदपत्रे ठाकरे गट जनतेसमोर आणणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
2013 साली उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे पुरावे असल्याचा ठाकरे गटाचा दावा
2018 साली झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीचा व्हिडिओ ठाकरे गटाकडे असल्याचा दावा
2018 साली झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांच्या कागदपत्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांच्या सह्या असल्याचा पुरावा असल्याचा ठाकरे गटाचा दावा
आजच्या महापत्रकार परिषदेची जोरदार तयारी ठाकरे गटाकडून सुरू असून या पत्रकार परिषदेत जनतेला देखील निमंत्रण देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय.
ठाकरे गटानं नार्वेकरांना घेरण्याचा चंग बांधला असताना विरोधकांकडून जोरदार प्रत्युत्तर आलं आहे. क्लीन बोल्ड झालेल्या माणसाने फिल्डिंग लावण्याच्या भानगडीत पडू नये असं म्हणत प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाला डिवचलं.
ठाकरेंच्या उद्याच्या पत्रकार परिषदेच्या आधीच राजकीय वातावरण तापू लागलंय. ठाकरे गट आजच्या जाहीर पत्रकार परिषदेत नेमकं काय करणार आहे, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.