अयोध्येमध्ये 22 जानेवारीला नव्याने राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठीची जय्यत तयारी गेल्या काही आठवड्यांपासून सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित हजारो अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासकीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. या सोहळ्याची चर्चा असतानाच आता अयोध्येमधून अजून एक बातमी समोर येत आहे. अयोध्येत ताजमहलापेक्षाही मोठ्या आकाराची भव्यदिव्य मशीद उभारली जाणार आहे. (Latest Marathi News)
कुठे उभारलं जाणार हे मशीद?
अयोध्या नगरीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धन्नीपुरात ही भव्य मशीद उभारली जाणार असल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाकडून फेब्रवारी 2020 मध्ये ही मशीद उभारण्यासाठी 5 एकरांचा भूखंड देण्यात आला होता. या मशिदीचं नाव मोहम्मद बिन अब्दुल्ला असे असणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या आकाराच्या मशिदींपैकी ही एक मशीद असणार आहे. अयोध्या नगरीमधील या मशिदीमध्ये 21 फुटांचे कुराण उभारण्यात येणार असल्याचीही माहिती हाती आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पाच मिनार असलेली ही भारतामधील पहिलीच मशीद असणार आहे. 2024 च्या रमजाननंतर म्हणजेच यावर्षीच्या उत्तरार्धामध्ये मशिदीचे बांधकाम सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी गंभीर आरोप सरकारवर केले आहेत. मंदिर वही बनाएंगे हा भाजपचा नारा होता, मात्र मंदिर तिकडे बनलंय की नाही हे जाऊन बघा. जिथे मंदिर बनवणार होते, तिथे मंदिर बनवलं नाही तर चार किलोमीटर लांब जाऊन मंदिर बनवलं आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
रामजन्मभूमी प्रकरणातील मुस्लीम पक्षाने देशातील सर्वात मोठी मशीद उभारण्याची तयारी सुरु केली आहे. देशातील इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन (आयआयसीएफ) या भव्य मशिदीच्या उभारणीच्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम करणार आहे. अयोधा नगरीमधील ही मशीद सौंदर्याच्याबाबतीत अगदी ताज महालपेक्षाही सुंदर असेल, असा विश्वास फाऊंडेशनला वाटत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.