Thackeray Group Vs Shinde Group Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray In Mumbra: उद्धव ठाकरेंनी शाखेकडे जाणं टाळलं, शिंदे गटाने साजरा केला जल्लोष

Uddhav Thackeray News: मुंब्रात वातावरण तापलं; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

साम टिव्ही ब्युरो

 Uddhav Thackeray Vs Eknath Shinde:

आज दिवसभर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हा राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवरुन शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

येथील शाखा तोडल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे शाखेची पाहणी करण्यासाठी मुंब्रा येथे दाखल झाले होते. मात्र ते शाखेची पाहणी न करताच मुंबईच्या दिशेने परतले आहेत. उद्धव ठाकरे येथून निघाल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, येथे मोठ्या संख्येने दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमले होते. उद्धव ठाकरे येथे दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्तेही खूप आक्रमक झाले होते. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना आपल्याला शाखेकडून जाऊन देण्यात यावं असं सांगितलं. मात्र दोन्ही गटाचे आक्रमक कार्यकर्ते पाहता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना शाखेकडे न जाण्याची विनंती केली. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन उद्धव ठाकरे हे देखील मागे परतले.

'सरकारला सत्तेचा माज आलाय'

येथून परतल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''सरकारला सत्तेचा माज आलाय असून त्यांचा माज निवडणुकीत उतरवू.'' ते म्हणाले, ''त्यांच्यात हिम्मत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून या.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Yellow Nails: नखांचा रंग पिवळा झालाय? वेळीच व्हा सावध, असू शकतो 'हा' गंभीर आजार

Asaduddin Owaisi: महाराष्ट्राच्या राजकारणात ओवैसींची एण्ट्री एमआयएमचा डोळा कुणाच्या मतांवर?

Sanjay Gaikwad: जमीन विकून आमदाराची 25 लाखांची मदत, संजय गायकवाडांच्या मदतीवर काँग्रेसचा आक्षेप

SCROLL FOR NEXT