Red paint thrown on Meenatai Thackeray’s statue at Shivaji Park sparks outrage, Uddhav Thackeray reacts. saam tv
मुंबई/पुणे

Meenatai Thackeray Statue: हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे संतापले

Uddhav Thackeray : दादर येथील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी या कृत्याचा तीव्र निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

Bharat Jadhav

ज्याला कोणाला आपल्या आई-वडिलांचे नाव घेण्याची लाज वाटत असेल. अशा लावारीस व्यक्तीनं हे कृत्य केलंय. कोणीतरी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीय. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कामध्ये असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर दादर आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण झालंय. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिलीय. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग कोणीतरी टाकला होता. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आहे. स्थानिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. लाल रंग कुणी फेकला, त्या अज्ञातांचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे. लाल रंग कुणी फेकला, त्या अज्ञातांचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी केली. हा महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी डाव आहे, अशी शंका त्यांनी पस्थित केली.

हा प्रकार निंदनीय असून ज्याला स्वत:च्या आई वडिलांची लाज वाटते अशा नराधमाने, बेवारस व्यक्तीने ही गोष्ट केली असेल. बिहारमध्ये ज्याप्रकारे मोदींच्या आईचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला तसा महाराष्ट्र पेटवण्याचे काम कोणी तरी करत असेल. आमच्या भावना तीव्र आहेत. आम्ही शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. पोलीस या घटनेतील आरोपीचा शोध घेत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

दादरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये आक्रोश आहे. सकाळपासून या भागात कार्यकर्त्यांची गर्दी आहे. हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा शिवसैनिकांनी पाण्याने मीनाताई ठाकरे यांचा पुतळा स्वच्छ धुतला. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, खासदार यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

सकाळी या प्रकाराची माहिती मिळताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्काला भेट दिली. तिथे संबंधित पोलीस अधिकारी यांच्याशी राज यांनी संवाद साधला. त्यावेळी परिसरातील सगळे सीसीटीव्ही चेक करा, २४ तासांत या आरोपीला शोधून काढा, अशा सूचना राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

Dhule News : बंद पाकिटातील बिस्किटावर बुरशी आणि अळ्या; कुठे घडला संतापजनक प्रकार?

Panvel Tourism : तलावाकाठी येईल चौपाटीवर फिरण्याचा फिल, पनवेलजवळील निसर्गरम्य ठिकाण

Asia Cup 2025: पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर; यूएईविरुद्ध सामना खेळण्यास नकार, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT