uddhav thackeray 
मुंबई/पुणे

बाेंबलून आशीर्वाद मिळत नाहीत; उद्धव ठाकरेंचा भाजपला टाेला

Siddharth Latkar

ठाणे : रस्त्यावर उतरुन गाेंधळ घालायचा. बाेंबलून आशीर्वाद मिळत नाहीत. आशीर्वाद द्या हाे आशीर्वाद द्या हाे असं म्हणत आशीर्वाद मिळत नाहीत. समाज सेवेतून मिळतात. म्हणूनच आपलं आणि ठाणेकरांचे नाते अतूट आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांनी स्पष्ट करीत विराेधकांना टाेला हाणला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायमस्वरुपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बाेलत हाेते. या साेहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिकांचा अभिमान वाटत असल्याचे सांगून विराेधकांना कानपिचक्या दिल्या.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले सत्तेच्या माध्यमातून लाेकांची सेवा करीत आहाेत. परंतु दुर्देवाने देशात समाजकारणा पेक्षा राजकारण १०० टक्के केले जात आहे. आपल्या समाेर तिस-या लाटेचा धाेका व्यक्त केला असतानाही यात्रा काढायच्या आहेत. देशात जनता जगली काय आणि त्यांचे प्राण गेले काय आम्हांला त्याचे काय. आम्हांला यात्रा काढायाच्या आहेत. ज्यांचे जीव कदाचित धाेक्यात येऊ शकतील असे उपक्रम राबवयाचे आहेत. का तर आम्हांला जनतेचे आशीर्वाद पाहिजेत. कशाला आशीर्वाद पाहिजेत जीव धाेक्यात घालण्यासाठी जनतेचे असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरेंनी केला.

शिवसैनिकांनी शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांची शिकवण तुम्ही जागती ठेवल्याचा मला अभिमान वाटताे. रुग्णवाहिका ही शिवसेनेची आेळख आहे. स्वतः अभिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्राण रुग्णवाहिकेमुळे कसे वाचले ते आम्हांला सांगितले आहे. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे नातं उगीच जुळलेले नाही. ठाणे म्हणजे आम्ही नुसतं ठणाणा करीत आहे असं नाही असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

काही जणांनी आज दहीहींडी साजरी केली असं सांगितले जात आहे. हे काही भुषणावह नाही. हा काही सरकारी कार्यक्रम नाही. फुकट काेराेना वाटप. हे गंभीर असल्याने आपण ससंर्ग वाढू नये यासाठी उपाययाेजना केल्या आहेत. मास्क लावणे, हात धुणे आणि अंतर ठेवणे या गाेष्टी पाळायलाच हवं. हे पाळले नाही तर तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहे. केंद्राने देखील आपल्याला पत्र दिले आहे. त्यात नमूद आहे. जे म्हणत आहेत ना हिंदु विराेधी सरकार असे म्हणणा-यांनी लक्षात घ्यावे केंद्राने त्यांच्या पत्रात दहीहंडी, गणेशाेत्सव काळात दक्षता पाळा असं म्हटलं आहे. आपण काेराेना विराेधात आहाेत. त्यामुळे आंदाेलन करण्याची ज्यांना खूमखूमी आहे त्यांनी काेराेना विराेधात करा.

प्रताप सरनाईक यांनी केलेला उपक्रम हा काेराेना विराेधी आंदाेलन आहे. हे असं करा. रुग्णालय द्या, प्राणवायूचे प्लॅन्ट द्या. पण ते करण्याची कुणाची हिम्मत नाही, कुवत नाही, विचार करण्याची प्रवृत्ती नाही, प्रग्लभता नाही असा टाेला मुख्यमंत्री ठाकरेंनी विराेधकांना लावला. आम्हांला फक्त रस्त्यावर उतरुन गाेंधळ घालायचा आहे. जे शिस्त पाळणारे नागरिक आहेत त्यांचा सुद्धा जीव धाेक्यात घालायचा आहे. त्यांच्याबद्दल न बाेललेच बरे.

रस्त्यावर उतरुन गाेंधळ घालायचा आहे. बाेंबलून आशीर्वाद मिळत नाहीत. आशीर्वाद द्या हाे आशीर्वाद द्या हाे असं म्हणत आशीर्वाद मिळत नाहीत. समाज सेवेतून मिळतात. म्हणूनच आपलं आणि ठाणेकरांचे नाते अतूट आहे असेही मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मला शिवसैनिकांचा सार्थ अभिमान आहे असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते प्रताप सरनाईक आदी उपस्थित हाेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT