Saamana Editorial on Samriddhi Mahamarg Accident Saam TV
मुंबई/पुणे

Saamana On Samruddhi Mahamarg Accident: अपघातांचे प्रमाण समृद्धी महामार्गावर जास्त का? सामनातून संतप्त सवाल; CM शिंदेंवर केला गंभीर आरोप

साम टिव्ही ब्युरो

Saamana Editorial Questions Government: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर शनिवारी (१ जुलै) रात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ७ प्रवाशी जखमी झाले आहेत. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. लोकार्पण झाल्यापासून  समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident)  सातत्याने अपघात होत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून 'समृद्धी'वरील अपघातांवर भाष्य करण्यात आलं आहे.

देशभरात असे अनेक महामार्ग गेल्या काही वर्षांत निर्माण झाले. दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी महामार्गावर जास्त का? असा सवाल सामना अग्रलेखातून शिंदे सरकारला (Eknath Shinde) विचारण्यात आला आहे.

‘एमएसआरडीसी’ कंपनीने हा मार्ग बांधला व हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे सांभाळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले, पण हे खाते त्यांनी स्वतःपाशीच ठेवले. कारण त्यात राज्याचे सगळय़ात मोठे अर्थकारण आहे. त्याच अर्थकारणातून समृद्धीवर बळी जात आहेत काय? असा प्रश्नही सामनातून सरकारला विचारण्यात आला आहे.

महाराष्ट्रात एक संवेदनाहीन सरकार सत्तेवर आहे. समृद्धी महामार्गावरील पेटलेली बस आणि त्यातील होरपळलेल्या प्रवाशांच्या किंकाळय़ा यांना काय अस्वस्थ करणार? तिकडे निरपराध्यांची प्रेते जळत होती व इकडे भाजप, मिंधे गट व अजित पवारांचा गट शपथविधी सोहळ्यात दंग होता. मुर्दाडांचे राज्य यालाच म्हणतात. असा घणाघातही सामनातून शिंदे सरकारवर करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या चिता जळत असताना मुंबईच्या राजभवनात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला. पेटलेल्या चिता व आक्रोशाची पर्वा न करता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सुरू होता. एकमेकांना पेढे भरवले जात होते. फटाके फोडून गळाभेटी घेतल्या जात होत्या, अशी टीकाही सामनातून करण्यात आली.

राजकीय उलथापालथीत व उखाळ्या पाखाळ्यात समृद्धीवरील ‘हत्या’ विसरल्या जाऊ नयेत. समृद्धी महामार्ग हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे स्वप्न होते. नागपूर मुंबईच्याजवळ आणावे. त्यातून विदर्भाचा विकास होईल, असे फडणवीस यांचे मत होते. त्यामुळे मुख्यमंत्री असताना व नंतरही फडणवीस यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी योजना पुढे नेली. तोच समृद्धी महामार्ग आता रोज माणसे खात आहे. बकासुराप्रमाणे बळी घेत आहे, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18 : 'बिग बॉस'च्या प्रोमोचा व्हिडिओ आला; सलमान खानचं 'भविष्य' दिसलं!, VIDEO बघा

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Astrology: ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक असतात भाग्यवान, तुमचा बर्थडे कधी?

October Heat: ऑक्टोबर हिटमध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

SCROLL FOR NEXT