Buldhana Bus Accident: मुलाला कॉलेजमध्ये सोडलं अन् विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली; प्राध्यापकासह पत्नी आणि मुलीचा होरपळून मृत्यू

Buldhana Bus Accident Samruddhi Mahamarg News: राज्यासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खाचा ठरला. कारण, विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील बुलडाण्याजवळ एका खासजी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला.
Samruddhi Mahamarg Buldhana Bus Accident
Samruddhi Mahamarg Buldhana Bus AccidentSaam TV
Published On

Buldhana Bus Accident Samruddhi Mahamarg News: राज्यासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खाचा ठरला. कारण, विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील बुलडाण्याजवळ एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. डिझेल टाकीने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Samruddhi Mahamarg Buldhana Bus Accident
Samruddhi Highway Bus Accident: बेताच्या परिस्थितीत नोकरी मिळवली, जॉईन होण्यासाठी पुण्याला निघाला; पण वाटेतच...

पोलिसांकडून (Police) मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. दरम्यान, मृतांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. प्राध्यापक कैलास गंगावणे (वय ४८) त्यांची पत्नी कांचन गंगावणे (वय ३८) आणि मुलगी सई गंगावणे (वय २०) अशी मृतांची नावे आहेत.

प्राध्यापक कैलास गंगावणे यांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडण्यासाठी ते नागपूरात गेले होते. दरम्यान, नागपूर येथून पुण्याकडे परतत असताना ते विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमध्ये बसले.

मात्र, बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा येथे  समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) झालेल्या बस अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. प्राध्यापक कैलास गंगावणे यांची मुलगी सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता.

Samruddhi Mahamarg Buldhana Bus Accident
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातात २५ जणांचा मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारे PHOTOS

दरम्यान, या तिघांचाही फोन लागत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर तसेच बसच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कैलास गंगावणे (Pune News) यांचे मेव्हणे अमर काळे यांनी त्यांचा शोध सुरू केला. निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी देखील तातडीने हालचाल करून या अपघातात बाबत बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांची संपर्क साधून तातडीने माहिती घेतली.

नागपूरहून (Nagpur) पुण्याकडे निघालेल्या प्रवाशांच्या यादीमध्ये या तिघांचेही नाव असून त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन अपघातस्थळी असल्याने हे तिघे या बसमधून प्रवास करत होते, अशा निष्कर्षाप्रत पोलीस आलेले आहेत. अपघाताच्या बातमीने निरगुडसर गावासह परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांचे अश्रुंचे अक्षरक्ष बांध फुटले. विद्यालयात शोकसंदेश व्यक्त करुन विद्यालयास सुट्टी देण्यात आली.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com