uddhav thackeray group saamana editorial Criticism pm narendra modi Government on lok sabha elections Saam TV
मुंबई/पुणे

Political News: निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाही सत्तेतून पायउतार होणारच; सामना अग्रलेखातून भाजपला चिमटे

Saamana Editorial BJP Criticism: 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे, अशी टीका सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली.

Satish Daud

Saamana Editorial BJP Criticism: 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे. ‘इंडिया’ आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

‘चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आणलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच. ओढून–चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे, असा टोलाही सामना अग्रलेखातून भाजपला लगावण्यात आला आहे.

‘चांद्रयान 3’ मोहिमेचा एकूण खर्च किती झाला? तर 650 कोटी रुपये आणि दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वेच्या 3 किलोमीटर रस्त्याचा खर्च 750 कोटींवर गेल्याचे उघड झाले. जे काम फार तर 75 कोटींत व्हायला हवे ते 750 कोटींवर गेले. मग मधल्या पाचशे कोटींचा हिशेब कोठे गेला? ते भाजपच्या तिजोरीत गेले की भाजप पुरस्कृत ठेकेदाराच्या खिशात? असा सवालही सामनातून भाजपला विचारण्यात आला.

भाजपचे (BJP) खासदार डी. अरविंद यांनी सांगितलेच आहे की, ‘ईव्हीएम’चे कोणतेही बटण दाबा, मत भाजपलाच पडत असते. याचा अर्थ असा की, सर्व हेलिकॉप्टर्सबरोबर लाखो ‘ईव्हीएम’ही भाजपने बुक करून ठेवलीत. त्याबाबतही त्यांचा वेगळा खर्च आणि हिशेब असणारच. अर्थात तुम्ही कितीही काहीही बुक केले तरी यावेळी मतदार भ्रष्ट ईव्हीएमच्या छाताडावर पाय ठेवून हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं.

‘2024’चा वाईट काळ 2023 च्या मावळतीस तंत्र-मंत्र, ईव्हीएम विद्येने नष्ट करता येईल काय? यावर म्हणे अंतस्थ गोटात खलबते सुरू आहेत. निवडणुका 2024 ला करा नाहीतर 2023 अखेरीस करा, मोदी-शहांच्या कुंडलीत राजयोग नाही व चोऱ्यामाऱ्या करून असे काही करण्याचा प्रयोग केलाच तर ते सर्व प्रकरण त्यांच्यावरच उलटेल. भाजपची हुकूमशाही कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून पायउतार होणार आहे हे नक्की, अशी टीकाही सामनातून भाजपवर करण्यात आली.

भारतमाता म्हणजे मोदी-शहा-अदानी नसून 140 कोटी जनता, ही जनता 2024 मध्ये हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करून वधस्तंभावरील लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करील. त्यासाठीच ‘इंडिया’ आघाडीने जन्म घेतला आहे. लोकशाहीत जनता हीच नरसिंहाचा अवतार आहे. त्यामुळे 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: शरद पवार गटाला मोठा धक्का! गडचिरोलीत बाबा आत्रम यांचा विजय

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT