Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील अपघातांचं धक्कादायक कारण समोर; तज्ज्ञांची चक्रावून टाकणारी माहिती

Samruddhi Mahamarg Accident News: तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, समृद्धी महामार्गावरील बहुतांश अपघात होण्याचं कारण वाहनाचा अतिवेग तर आहेच, पण याशिवाय चालकांना डुलकी लागल्याने देखील अपघात घडत आहेत.
Samruddhi Mahamarg Accident Experts said shocking reason
Samruddhi Mahamarg Accident Experts said shocking reasonSaam tv

Samruddhi Mahamarg Accident News: गेल्या वर्षभरापासून राज्यातील रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे सातत्याने रस्ते अपघातांच्या घटना घडत आहेत. विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धीवरील अपघातांचं सत्र सुरूच आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये समृद्धी महामार्गावर ४७ भयानक अपघात झाले. यामध्ये तब्बल १०१ जणांचा आपला जीव गमावावा लागला. (Latest Marathi News)

Samruddhi Mahamarg Accident Experts said shocking reason
Maharashtra Politics: अजित पवारांना मोठा धक्का, १५ दिवसांपूर्वी घेतलेला 'तो' निर्णय फडणवीसांनी घेतला मागे

एकीकडे परिवहन विभाग महामार्गावरील अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे तज्ज्ञांनी चक्रावून टाकणारी माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, समृद्धी महामार्गावरील बहुतांश अपघात होण्याचं कारण वाहनाचा अतिवेग तर आहेच, पण याशिवाय चालकांना डुलकी लागल्याने देखील अपघात घडत आहेत.

समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक अपघात हे पहाटेच्या वेळेत झालेले असून यामध्ये ४४ जणांचा आपला जीव गमावावा लागला आहे. शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त वेळ वाहन चालविण्याने येणारा थकवाही अपघातांना कारणीभूत असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे.

Samruddhi Mahamarg Accident Experts said shocking reason
Indigo Plane News: इंडिगोच्या विमानात पुन्हा गडबड, इंजिन हवेतच पडलं बंद; पायलटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जुलै २०१३ या आठ महिन्यांदरम्यान, ७२९ अपघात झालेले आहेत. या अपघातांमागे एकच एक कारण नाही. परंतु जी काही कारणे तज्ज्ञांच्या पाहणीतून समोर आले आहे, ती सर्व मानवी चुकांमुळेच अपघात झाल्याची आहेत.

दरम्यान, मुंबई ते नागपूर अशा ७१० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. महामार्गावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच सतत होणाऱ्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com