Indigo Plane News: इंडिगोच्या विमानात पुन्हा गडबड, इंजिन हवेतच पडलं बंद; पायलटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Indigo Plane Engine Shutdown: विमानात अनेकदा बिघाड झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. उड्डाण भरलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांसह प्रशासनाची देखील तारांबळ उडते. अशाच दोन घटना मंगळवारी (२९ ऑगस्ट) घडल्या. मदुराई ते मुंबई आणि कोलकाता ते बंगळुरू या दोन्ही विमानांचे इंजिन तांत्रिक कारणांमुळे हवेतच बंद पडले. (Latest Marathi News)
वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे विमानाला मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. दोन्हीं विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र, उडत्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती.
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंडिगो एअरलाईन्सचे (Indigo Plan) विमान मदुराईहून मुंबईच्या दिशेने येत होते. मात्र, मुंबईत उतरण्यापूर्वी विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमानाचे एक इंजिन हवेतच बंद पडले. यानंतर पायलटने सतर्कता दाखवत एका इंजिनच्या जोरावर सुरक्षितपणे लँड केले.
सध्या हे विमान मुंबईत ठेवण्यात आले असून सर्व आवश्यक तपासणीनंतर ते पुन्हा कार्यान्वित केले जाईल. दुसरी घटनाही अशाच प्रकारची आहे. कोलकाताहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाचे इंजिन हवेतच बंद पडले. तांत्रिक कारणामुळे इंजिनमध्ये बिघाड झाला. सुदैवाने हे विमान देखील मुंबईत सुखरुप लँड करण्यात आले. या विमानाचीही तपासणी केली जाणार आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.