Uddhav Thackeray Group Saamana Editorial Big Claim on Ajit Pawar Oath Shinde-Fadnavis Government Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत; लवकरच... सामनातून खळबळजनक दावा

Saamaan Editorial on Ajit Pawar Oath: ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवरून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

Satish Daud

Saamaan Editorial on Ajit Pawar Oath: राज्याच्या राजकारणात रविवारी मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ यांच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनं महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अशातच, ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

'महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल'

"शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल. शिवरायांच्या राज्यात हे काय चालले आहे?" असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

"महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणाचाही चिखल मोदी व शहा यांच्या भारतीय जनता पक्षाने केला आहे. अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह रविवारी दुपारी राजभवनात पोहोचतात. पाठोपाठ देवेंद्र फडणवीस त्यांच्या लवाजम्यासह येतात व पवार हे आठ मंत्र्यांसह शपथ घेऊन स्वतःला भाजपच्या दावणीला बांधून घेतात. अजित पवार यांच्या सरकारीकरणास काय म्हणायचे?" असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

'अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत...'

"जे शिवसेनेच्या बाबतीत वर्षभरापूर्वी घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे; पण या वेळी ‘डील’ पक्के आहे. पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत. लवकरच घटनेनुसार एकनाथ शिंदे व त्यांच्या फुटीर आमदारांचे विसर्जन होईल व अजित पवारांना सिंहासनावर बसवले जाईल", असा खळबळजनक दावाही सामनातून करण्यात आला आहे.

'देवेंद्र फडणवीसांचा पोपट झाला'

"या सगळय़ात ‘पोपट’ झाला आहे तो श्रीमान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा. ‘‘नाही, नाही. राष्ट्रवादीबरोबर कदापि जाणार नाही. तो भ्रष्टाचाऱयांचा पक्ष आहे,’’ असे ते मान हलवत, मानेला झटके देत सांगत होते. अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन भ्रष्टाचाराचा आरोप आहे व पवारांना सोडणार नाही अशी त्यांची भाषा होती. यानिमित्ताने भाजपचा खरा चेहरा पुन्हा उघडा पडला", असा घणाघातही सामनातून फडणवीसांवर करण्यात आला.

"ज्यांनी स्वाभिमानासाठी वगैरे बतावण्या करून शिवसेना फोडली त्यांचे नशीबच आता फुटले. त्यांचे नकली हिंदुत्वही संपले. शिंदे व त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हाच राजभवनातील रविवारच्या शपथविधीचा खरा अर्थ आहे. एक मिंधे जातील व दुसरे येतील", असा हल्लाबोलही सामनातून शिंदे गटावर करण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT