Supriya Sule on Ajit Pawar : जे घडलं ते वेदनादायी; नव्या उमेदीनं पक्ष उभा करू; अजित पवारांबद्दल बोलताना सुप्रिया सुळे भावुक

Supriya Sule on Ajit Pawar Latest News : अजित पवार यांनी वेगळी वाट निवडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला साथ दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले.
Supriya Sule on Ajit Pawar Latest News
Supriya Sule on Ajit Pawar Latest NewsSAAM TV
Published On

Supriya Sule on Ajit Pawar Latest News : अजित पवार यांनी वेगळी वाट निवडून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला साथ दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी रविवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. जे काही घडलं ते वेदनादायी आहे, असं सांगतानाच माझ्या आणि दादाच्या नात्यात काहीही बदल होणार नाही. तो माझा मोठा भाऊच राहील, अशी भावुक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

Supriya Sule on Ajit Pawar Latest News
Disqualification Petition Against Ajit Pawar : अजित पवारांसह ९ सदस्यांविरोधात अपात्रतेची कारवाई होणार, याचिका दाखल; जयंत पाटलांची माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करतानाच लगोलग उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदार गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. ( Latest Marathi News)

अजित पवार यांची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यासंदर्भात पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. शरद पवार हे सर्वांसाठी प्रिय आहेत. त्यांनी सगळ्यांना मुलासारखं वागवलं. आजची घटना वेदनादायी आहे. दादाबद्दल प्रेम कायम राहील. तो कायमच मोठा भाऊ राहील. दादा आणि माझ्यात कधीच वाद झाले नाहीत, होणारही नाहीत, शेवटी तो माझा मोठा भाऊ आहे, असं सांगताना सुप्रिया सुळे भावुक झाल्या होत्या.

Supriya Sule on Ajit Pawar Latest News
Maharashtra Politics: अजित पवारांसोबत किती आमदार आणि खासदार? संपूर्ण यादीच आली समोर

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून गेलेले सर्व लोक हे माझ्या कुटुंबातील आहेत. मात्र आम्ही नव्या उमेदीने पुन्हा पक्ष उभा करू, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवला. पक्ष आणि जबाबदारीचा प्रश्न येतो त्यावेळी मी त्याकडे प्रोफेशनली बघते. गेल्या चार वर्षांत माझ्यावरही थोडीशी जबाबदारी आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार- सुप्रिया सुळे

अजित पवारांच्या निर्णयाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'या देशात लोकशाही आहे. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. नाती आणि कामात गल्लत होता कामा नये, याची मला जाणीव आहे. अजितदादा हा माझा भाऊ आहे. मी बहीण म्हणून त्याच्यासोबत आयुष्यभर राहील. पण शरद पवार हे माझे वडील आहेत. मी त्यांचीही साथ सोडणार नाही. '

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com