Disqualification Petition Against Ajit Pawar : अजित पवारांसह ९ सदस्यांविरोधात अपात्रतेची कारवाई होणार, याचिका दाखल; जयंत पाटलांची माहिती

Maharashtra Political News : अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या इतर ८ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे.
Ajit Pawar And Jayant Patil News
Ajit Pawar And Jayant Patil NewsSAAM TV
Published On

Maharashtra Political News : अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या इतर ८ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भातील मागणीची याचिका महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर आम्हाला माहीत झालं. त्याच क्षणी ते अपात्र ठरले. आम्ही अपात्रतेची याचिका काही वेळापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. ती प्रत इमेलद्वारे पाठवली आहे.

अपात्रतेच्या याचिकेची प्रत पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन केला, त्यांनी उचलला नाही. त्यांना मेसेज केलाय. व्हॉट्सअॅपवरही कॉपी पाठवली आहे. अपात्रतेची याचिका प्रत्यक्ष देण्याची व्यवस्था केली आहे, असेही त्यांनी सांगितले. Latest Marathi News)

Ajit Pawar And Jayant Patil News
Ajit Pawar Live News: दादा आणि माझ्यात कधीच वाद होणार नाही - सुप्रिया सुळे

निवडणूक आयोगालाही आम्ही पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची कृती मान्य नाही. पक्षाचा ताबा घेण्याचा दावा सांगतील, पण आम्ही आहोत. राष्ट्रवादी अस्तित्वात आहे अशी कल्पना आधीच पत्राद्वारे दिली आहे, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

शिस्तपालन समितीलाही पत्र लिहिलं होतं. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात सांगितलं. आम्ही त्यानुसार संबंधित सदस्यांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. विधानसभा अध्यक्षांनी उद्या सकाळी आम्हाला बोलावलं पाहिजे. ज्या ९ सदस्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन शपथ घेतली, त्यांच्याविरोधात आम्ही अपात्रतेची याचिका दाखल केली आहे, असेही ते म्हणाले.

Ajit Pawar And Jayant Patil News
Maharashtra Politics: अजित पवारांसोबत किती आमदार आणि खासदार? संपूर्ण यादीच आली समोर

जितेंद्र आव्हाड यांना व्हीपचा अधिकार दिला आहे. त्यांचा व्हीप सर्वांना लागू असेल. ते स्वतः विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन प्रत्यक्षपणे अपात्रतेची याचिका देतील. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मला कोणतीही कल्पना न देता पक्षविरोधी कृती ज्या क्षणी केली, आमच्या पक्षाच्या धोरणांविरोधात जाऊन त्यांनी शपथ घेतली, त्या क्षणी ते अपात्र ठरले आहेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

सर्वांना परत यायचं आहे..

सर्वांना परत यायचंय. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करत नाही. त्यांना थोडा वेळ देऊ. त्यांना काहीच माहीत नाही. कोणत्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या याची कल्पना नाही. शरद पवार हे उद्या साताऱ्याला जात आहेत. तेथून ते महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करतील. ते पुन्हा योद्धा म्हणून सामोरे जात आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com