How Many Mla with Ajit Pawar: राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी करत अजित पवार यांनी आज शिवसेना आणि भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यातच अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आणि खासदार आहेत? त्यांच्यासोबत पक्षातील कोण-कोणते नेते आहेत, याची संपूर्ण यादी आता समोर आली आहे.
अजित पवार यांच्यासोबत किती आमदार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्यासोबत एकूण 37 आमदार आहेत. यात विधानसभेचे 31 आणि विधानपरिषदेचे 6 आमदारांचा समावेश आहे.
अजित पवारांसोबत असलेले आमदार
1. छगन भुजबळ
2. दिलीप वळसे पाटील
3. हसन मुश्रीफ
4. धनंजय मुंडे
5. आदिती तटकरे
6. संजय बनसोडे
7. अनिल पाटील
8.धर्मरावबाबा आत्राम
9.किरण लहमाटे
10. निलेश लंके
11. दौलत दरोडा
12. मकरंद पाटील
13. अतुल बेनके
14. सुनिल टिंगरे
15. इंद्रनील नाईक
16. अशोक पवार
17. अण्णा बनसोडे
18. सरोज अहिरे
29. बबनदादा शिंदे
20. यशवंत माने
21. नरहरी झिरवळ
22. दत्ता भरणे
23. शेखर निकम
24. दीपक चव्हाण
25. राजेंद्र कारेमोरे
26. नितीन पवार
27. मनोहर चंद्रिकापुरे
28. संग्राम जगताप
29. राजेश पाटील
30. सुनील शेळके
31. दिलीप मोहिते
विधानपरिषदेचे आमदार कोणते?
1. रामराजे निंबाळकर
2. अमोल मिटकरी
3. शशिकांत शिंदे
4. अनिकेत तटकरे
5. विक्रम काळे
6. सतिश चव्हाण
अजित पवार यांच्यासोबत किती खासदार?
अजित पवार यांच्यासोबत पक्षातील तीन खासदार आहेत. यात दोन लोकसभा आणि एक राज्यसभेतील खासदार आहेत. सुनिल तटकरे आणि
अमोल कोल्हे हे लोकसभेतील खासदार त्यांच्यासोबत आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार त्यांच्यासोबत आहे. (Latest Marathi News)
शरद पवार यांच्यासोबत किती आमदार आणि किती खासदार?
अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांच्यासोबत 15 आमदार आहेत. यात 12 आमदार विधानसभेचे, तर 3 विधानपरिषद आहेत. तसेच त्यांच्यासोबत चार खासदारही आहेत. यात सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचा समावेश आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.