Maharashtra Politics: शिंदेंना आटोक्यात ठेवण्यासाठी भाजपचा डाव? काय म्हणाले जयंत पाटील?

NCP Jayant Patil after Ajit Pawar Joins Shivsena-BJP Government : शिंदेंना आटोक्यात ठेवण्यासाठी भाजपचा डाव? काय म्हणाले जयंत पाटील?
Jayant Patil on Eknath Shinde
Jayant Patil on Eknath ShindeSaam TV
Published On

Jayant Patil on Eknath Shinde: ''मधल्या काळात एकनाथ शिंदे प्रचंड जोरात चालले होते. ते कुणाचं एकूण घेत नव्हते. ठाणे जिल्ह्यात तर ते कुणाचीच नियुक्ती मान्य करत नव्हते. त्यामुळे काही लोकांना एकनाथ शिंदे यांचा प्रचंड राग असावा. त्यामुळे त्यांना पर्याय निर्माण करण्यासाठी हे केलं असावं'', असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

जयंत पाटील म्हणाले, ''एकनाथ शिंदे आणि अनेक आमदारांनी तिथे जाताना (मविआसरकार सोडताना) सांगितलं होतं की, अजित पवार अर्थमंत्री होते आणि त्यांच्यामुळे आणि राष्ट्रवादीमुळे आमच्यावर अन्याय झाला. म्हणून आम्ही तिथे चालो आहोत. आता हेच सगळे तिकडे गेले असतील, तर मग त्यांना (एकनाथ शिंदे आणि आमदारांना) परत जायला संधी आहे.'' (Did BJP take Ajit Pawar along to keep Eknath Shinde under control - Jayant Patil made big statement about this)

Jayant Patil on Eknath Shinde
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटासोबत सुखात नांदणार: नाना पटोले

'जनता शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभी'

तत्पूर्वी बोलताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, "सत्तेत असणाऱ्या पक्षाने पुन्हा एकदा आणखी एक पक्ष फोडण्याच काम केलं आहे. वाटेल त्या पद्धतीने सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मात्र, जनता शरद पवार यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिल. याचा आम्हाला विश्वास आहे.''  (Latest Marathi News)

अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता ते म्हणाले आहेत की, "आम्ही कारवाईच्या बाबातीत अजून अभ्यास केलेला नाही. मात्र आम्ही योग्य ती पाऊलं टाकणार आहोत. ज्या सहकाऱ्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनीच राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधी जावून भूमिका घेतलेली आहे. पण मी बाकीच्या आमदारांना दोष देणार नाहीं.''

Jayant Patil on Eknath Shinde
Maharashtra Political Weather Update: राज्यात राजकीय भूकंप, राष्ट्रवादीत फूट, अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी; दिवसभरात काय घडलं आणि पुढे काय घडेल?

'बंड केलेल्यांपैकी बऱ्याच जणांचा आम्हाला फोन आला'

ते पुढे म्हणले, "बंड केलेल्यांपैकी बऱ्याच जणांचा आम्हाला फोन आला आहे. काही आमदारांच्या सह्या का घेतल्या, हे त्या आमदारांनाही माहिती नाही. पण ज्या नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांची शपथ ही पक्षाच्या धोरणाविरोधी आहे. तसेच आमदारांकडून ज्या सह्या घेतल्या त्या कशावर घेतल्या ते आमदारांना माहित नाही, असं आम्हाला काही आमदार सांगत आहेत.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com