Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : शिंदेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही; उद्धव ठाकरे पहिल्या पाचमध्ये होते, राऊतांचा घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Satish Daud

Sanjay Raut News : एकनाथ शिंदे यांना कुणी मुख्यमंत्री मान नाही. त्यांचं नाव देशातील पहिल्या १० मुख्यमंत्र्यामध्येही नाही. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये होते, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maharashtra Political News)

खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची प्रगती, विकास काहींना पाहावत नव्हता, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. सरकारने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाला विकत घेतलं आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत?

मुळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कुणी मुख्यमंत्री मान नाही. त्यांचं नाव देशातील पहिल्या १० मुख्यमंत्र्यामध्येही नाही हे दुर्देवी आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये होते, त्यानंतर ते चारमध्ये आले. हळूहळू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती पकडत असताना हे सरकार पाडण्यात आलं. कुठेतरी महाराष्ट्राचे पंख कापले जावे, महाराष्ट्राची प्रगती आणि विकास काही लोकांना पाहावत नव्हता, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

पुढे बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, तुम्ही आनंदउत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागा, अशा प्रकारची भाषा जर हे लोकं करीत असतील. याचा अर्थ सुप्रीम न्यायालय आणि निवडणूक आयोगाला यांनी विकत घेतलं आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

त्याचबरोबर शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार याचा निकाल अजून लागायचा आहे आणि निकाल लागण्याआधीच या सर्वांनी (शिंदे-भाजप) जाहीर केलं आहे की आम्हीच जिंकतो आहे. याला काय म्हणायचं? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांना नोटीस बजावायचं काही कारण नाही. त्यांनी ज्या उद्योहपती बद्दल जे प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर द्यायला हवे होते. त्यांना संधी होती. खरतर त्यांनी हक्कभंग केला आहे सभागृहाचाआणि आमचा . हक्कभंग त्यांनी लेकभावनेचा भंग केल हा पलायनवाद आहे पळपुटेपणाच आहे. तुम्हा नियमांचा आधार घेवून नोटीसा पाठवत आहात हीच हुकूमशाही आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kandyachi Chutney Recipe : ना परतायची गरज ना भाजायची, फक्त ५ मिनिटांत 'अशी' बनवा कांद्याची झणझणीत चटणी

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या नावावर तब्बल १०० मालमत्ता, किंमत जवळपास २०० कोटींहून अधिक

Famous Actor Father Death : प्रसिद्ध अभिनेत्याला पितृशोक; वाढदिवशीच वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

Fack Check : केंद्र सरकारची नवी योजना, रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत मोबाईल?

Ashok Kharat: पतीचा मृत्यू अटळ आहे, भीती दाखवून महिलांचं लैंगिक शोषण; खरातविरोधात आणखी ११ महिलांची तक्रार

SCROLL FOR NEXT