Shivsena vs BJP : मोदी एकटे नाहीत, त्यांच्यासोबत साप, विंचू, मगरी.., सामनातून जहरी टीका

मोदींनी विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत, अशी जहरी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
PM Narendra Modi Uddhav Thackeray File Photo
PM Narendra Modi Uddhav Thackeray File PhotoSaam TV
Published On

Shivsena vs BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना ‘मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं’ असं म्हणत विरोधकांना चिमटे काढले होते. आपल्या भाषणात मोदींनी शायरी करत विरोधकांवर निशाणा देखील साधला होता. दरम्यान, मोदींच्या या विधानाचा सामनातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. (Maharashtra Political News)

PM Narendra Modi Uddhav Thackeray File Photo
Gautami Patil News : दादा मला माफ करा, गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची माफी; काय आहे प्रकरण?

पंतप्रधान श्री. मोदी छातीवर मूठ मारून जे सांगतात की, ‘‘मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं.’’ हे काही खरे नाही. विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत, अशी जहरी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

इतकंच नाही तर, महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही. राज्यघटनेची व तिच्या रक्षकांची इतकी मानहानी कधीच झाली नव्हती, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

आपण एकटेच सर्व विरोधकांना कसे भारी पडलो आहोत हे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी भर संसदेत छातीवर मूठ आपटून सांगितले. वेगळय़ा भाषेत त्यास ‘छाती पिटणे’ असेही म्हटले जाते. असे छाती पिटून बोलणे पंतप्रधानपदास शोभत नाही. हाती पोलीस, न्यायालय, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज ठेवून ‘‘मी एकटाच लढत आहे व सगळय़ांना भारी पडत आहे’’ असे सांगणे मजेशीर आहे व ही मजा फक्त मोदीच करू शकतात, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

PM Narendra Modi Uddhav Thackeray File Photo
Maharashtra Politics : निवडणुका लागू तर द्या, आम्ही सुद्धा... ठाकरेंच्या 'त्या' आव्हानाला शिंदेंचं उत्तर

मोदी सरकारने जाता जाता काही राज्यपालांचे पत्ते पिसले आहेत. महाराष्ट्रातून भगतसिंह कोश्यारी यांना अखेर जावे लागले. महाराष्ट्राच्या राज्यपालांना घालवले नसते तर जनता एक दिवस राजभवनातच घुसली असती. इतका संताप त्यांच्याविषयी निर्माण झाला होता, असा घणाघातही सामनातून भाजपवर करण्यात आला आहे.

मोदींनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून ‘मविआ’ सरकारविरुद्ध अनेक बेकायदेशीर कृत्ये करून घेतली. ‘मविआ’ सरकार असताना कोश्यारी यांनी बहुमतातील सरकारच्या शिफारसींना केराची टोपली दाखवली. 12 नामनियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नियुक्त्या होऊ दिल्या नाहीत. कोश्यारी यांची जागा झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आणि तेदेखील मनाने व रक्ताने भाजपचे स्वयंसेवकच आहेत. त्यावर नंतर बोलू, असा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com