uddhav thackeray group saamana editorial slams pm narendra modi over inflation Saam TV
मुंबई/पुणे

Saamana Editorial On BJP: भाजीपाल्याच्या दराने 'त्रिशतक' गाठलं; मोदी सरकार मात्र फोडाफोडीच्या राजकारणात दंग; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Saamana Editorial On Modi Government: 'महागाई वाढली असताना मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आहे, अशी टीका ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांच्या भूमिकेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे मात्र देशात भाजीपाल्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या महगाईवरून ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

'महागाई वाढली असताना मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आहे, अशी टीका ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. (Latest Marathi News)

किरकोळ बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे दर शंभरी पार झाले आहेत. या वाढत्या महागाईला मोदी सरकारला जबाबदार धरत ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे.

देशात महागाई वाढली

'मोदी सरकारच्या काळात महागाई वाढत चालली आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून सोने-चांदी आणि चैनीच्या गोष्टींपर्यंत सगळ्याचेच भाव आकाशाला भिडले आहेत. दैनंदिन जीवनातील भाजीपाला, फळफळावळ यांचेही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, असे म्हणत ठाकरे गटाने वाढत्या महागाईला मोदी सरकारला जबाबदार धरले.

महागाईवरून ठाकरे गटाचा मोदी सरकारला सवाल

'मोदी सरकार नऊ वर्षांच्या सत्ताकाळातील निर्णयांचे ढोल तुम्ही सर्वत्र पिटत आहात. मग या नऊ वर्षांनंतरही 'महंगाई डायन' सामान्यांच्या मानगुटीवरून उतरण्याचे नाव का घेताना दिसत नाही? असा सवाल ठाकरे गटाने मोदी सरकारला केला आहे.

टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ

'भाजीपाल्याच्या दराने ‘त्रिशतक’ गाठले आहे, टोमॅटो भडकला आहे, जनता ‘लालबुंद’ झाली आहे. तिकडे मणिपूर पेटलेलेच आहे. मोदी सरकार मात्र नेहमीप्रमाणे शांत आणि ढिम्म आहे, अशी टीका ठाकरे गटाने दैनिक सामनातून केली आहे.

मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग

'मोदी सरकार नऊ वर्षांच्या सत्ताकाळाचे ढोल पिटत आहे, फोडाफोडीच्या राजकारणात दंग आहे. महागाईच्या वणव्याची आणि त्यात होरपळणाऱ्या जनतेची या सरकारला जाणीव आहे काय? असा सवाल करत ठाकरे गटाने मोदी सरकारवर महागाईवरून हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT