Uday Samant News
Uday Samant NewsSaam TV

Uday Samant News : एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहणार, उदय सामंत यांनी ठणकावून सांगितलं

Political News : अजित पवार मुख्यमंत्री होतील व शिंदे साहेब राजीनामा देणार हे वृत्त बिनबुडाचे आहे.
Published on

Mumbai News : मुख्यमंत्री राजीनामा देतील, अशी अफवा पसरवली जात आहे. काहीजणांकडून जाणिवपूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मुख्यमंत्री राजीनामा देण्याचे वृत्त अत्यंत चुकीचे आहे. आम्ही राजीनामे देणारे नाही तर राजीनामे घेणारे आहोत, वर्षभरापूर्वी आम्ही ते दाखवून दिले आहे, असं उद्योगमंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बैठकीत ज्या गोष्टी घडल्याच नाहीत, त्या प्रसारमाध्यमांकडे जाणिवपूर्वक पोचवल्या जात आहेत. मात्र शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृ्त्वावर विश्वास व्यक्त केला असून पक्षात कोणतीही नाराजी नाही, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. (Tajya Batmya)

Uday Samant News
Pune IAS Transfer News : मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुण्यातील बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा लिस्ट

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार मुख्यमंत्री होतील व शिंदे साहेब राजीनामा देणार हे वृत्त बिनबुडाचे आहे. हे वृत्त पसरवणाऱ्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही, असे उदय सामंत यांनी ठणकावले. आम्हाला महायुतीवर ठाम विश्वास आहे. एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील हे देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Political News)

Uday Samant News
MNS Raju Patil : समोरच्याला युतीपेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदेंचे नेतृत्व संयमी, सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे, त्यामुळे त्यांच्याबाबत काहीही बोलले तर चालेल असे समजून अफवा पसरवल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात विकासकामे करत आहेत व आमच्या लोकांची विकासकामे व्हायला हवीत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सहभागी झाल्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत कोणताही गैरसमज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com