उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, 'मी पुन्हा येईन म्हणणारे, आता म्हणतायत मी गेलोच नाही Saam Tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, 'मी पुन्हा येईन म्हणणारे, आता म्हणतायत मी गेलोच नाही

मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा सोहळा यावर्षी देखील कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर षण्मुखानंद सभागृहात कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या कार्यक्रमाकडं सर्वांचं लक्ष लागून आहे.

हे देखील पहा-

दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होत आहे. पण, तरीही शिवसैनिकांमध्ये तोच जोश बघायला मिळत आहे. यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार आहे हे बघायला मिळणार आहे. ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. या दसऱ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपला आवाज कुणी दाबु शकत नाही जन्माला देखील आला नाही.

तसेच पुढे त्यांनी जिवंत शिवसैनिक हीच माझे खरं शस्त्र असल्याचे दाखवले आहे. मला मी मुख्यमंत्री आहे, असे कधीच वाटू नये, अशी खोचक प्रतिक्रिया ठाकरेंनी फडणवीसांनावर केली आहे. मी पुन्हा येईन म्हणणारे, आता म्हणतायत मी गेलोच नाही. नाही गेलो तर मग बसा तिथेच, असा देखील ठाकरेंचा फडणवीसांना टोला लगावला आहे. पुढे ते माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकतोय कधी, याची काहीजण सध्या वाट पाहत आहेत. अंगावर जर कोणी आलं तरी तिथल्या तिथेच ठेचू,अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Eye Care : डोळ्यांची जळजळ अन् लाल झालेत का? पावसाळ्यात अशी घ्या काळजी

MPSC FDA Recruitment: अन्न व औषध प्रशासनात नोकरीची संधी; पगार १३२३०० रुपये; MPSC द्वारे जाहीर केली भरती

Khalapur Toll Plaza : बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई; खालापूर टोल नाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा गोरखधंदा उघड

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, टॅरिफनंतर ६ कंपन्यांवर घातली बंदी

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील सर्व आरोपी कोर्टात दाखल

SCROLL FOR NEXT