Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari: 'कोश्यारींना मणिपूरमध्ये पाठवा', उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक सल्ला

Uddhav Thackeray On Manipur: 'कोश्यारींना मणिपूरमध्ये पाठवा', उद्धव ठाकरेंचा भाजपाला खोचक सल्ला

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari: ''आपल्या देशात मणिपूरमध्ये जे दोन महिलांसोबत करण्यात आलं, ते व्हिडीओ समोर आलं म्हणून माहित झालं. तेथील मुख्यमंत्री म्हणतात अशा तर बऱ्याच घटना घडल्या आहे. असं बोलताना त्यांना लाच वाटायला हवी. राष्ट्रपती या महिला आहेत, त्या काय करत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आज ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाचा हिंदी भाषिक मेळावा पार पडला. यामध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, मणिपूर येथील राज्यपाल या महिला आहेत. तरी त्या काहीही करत नाही आहे. आमच्या इथे जे राज्यपाल (माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी) होते, ते कशी कृती करत होते. पाठवा त्यांना तिथे.

या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''आज हा जोश बघून काही लोकांचा होश उडाले असतील. ठाणे म्हणजे असली शिवसेना. आजकल मार्केटमध्ये चायनीज माल येतो, देवाच्या मूर्त्यापण येत असतील असे काहींचे देवही नकली आहेत.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''त्यांना वाटतं आपण शिवसेनेपेक्षा मोठे आहोत पण ते मोठे होऊ शकत नाही ते असेच वर जातील. मी आव्हानाला कधी आव्हान मानत नाही संधी मानतो.''

उद्धव ठाकरे म्हणाले, ''परीक्षा तभी होती है जब कठीण समय आता है. जेव्हा लढायची वेळ येते तेव्हा खरे सैनिक सोबत असतात. शिवसेनेनं उत्तर भारतीयांसाठी काय केलं? असं विचारलं जातं पण केलं नसतं तर तुम्ही इथं आलाच नसता.''

ते पुढे म्हणाले, ''मी कोणाहीसोबत भेदभाव केला नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. मला जे करायचं होतं ते मी कोरोनाच्या काळात केलं. माझं सौभाग्य आहे की महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानते.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT