Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Political News : खासगीकरणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; म्हणाले,'९ खासगी कंपन्या...'

शासनाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Uddhav Thackeray News : शासकीय-निमशासकीय नोकरभरती बाह्ययंत्रणेच्या करण्याच्या शासन निर्णय उद्योग-कामगार विभागाने मंगळवारी जारी केला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. व्यवस्था मोडण्यासाठी ९ खासगी कंपन्या आता भरती करणार असल्याची टीका ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीने संयुक्त सभा आयोजित केली आहे. या सभेआधीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'प्रत्यक्ष सरकार चालवत असतील त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर कसे होईल. सगळ्या यंत्रणा मोडून काढायचा हा त्यांचा कुटील डाव आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर मी काही बोलणार नाही. मविआ सरकार कशाला पाडलं, २००५ नंतर आपला देश जन्माला असे काही नाही, राज्य सराकारच्या मागे दिल्लीची महाशक्ती आहे'.

'राज्यातील अन्नदाता आक्रोश करतोय पण सरकार लक्ष देत नाही आहे. सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत पण लक्ष नाही, एवढी मोठी महाशक्ती यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांचे म्हणणे कोणी ऐकत नाही आहे. पंचामृत पळीतून दिले जाते त्यांने पोट भरत नाही. कोणाचेही यातून पोट भरणार नाही. सरकार (Government) येते आणि जाते मात्र शासकीय यंत्रणा कायम राहते, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

'सरकारी शासन व्यवस्था मोडण्यासाठी ९ खाजगी कंपन्या आता भरती करणार आहेत. राज्यातील उद्योग धंदे बाहेर पळवले गेले. दिल्लीश्वराच्या चरणी महाराष्ट्र अर्पण करण्याचे काम सुरू आहे. विरोधात बोलले की तुरूंगात टाकायचे. आमचा जो लढा सुरू आहे, ती लोकशाही जिवंत आहे की नाही या साठी आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं.

काय आहे शासनाचा निर्णय ?

शासकीय-निमशासकीय नोकरभरती बाह्ययंत्रणेच्या करण्याच्या शासन निर्णय उद्योग-कामगार विभागाने मंगळवारी जारी केला आहे. राज्यसरकारने नेमलेल्या मनुष्यबळ पुरवठा संस्थेमार्फतच भरती करावी लागेल. ९ मनुष्यबळ पुरवठा संस्थांची ५ वर्षांसाठी नेमणूक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT