Sheetal Mhatre Viral Video News: शिवसेना (Shivsena) पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हीडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या व्हीडिओवरुन गेल्या काही तासांपासून राजकारण चांगलंच तापलंय. या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत शितल म्हात्रे यांनी भूमिका मांडली होती, मात्र आमदार प्रकाश सुर्वेंनी कोणताही खुलासा केला नव्हता.
अखेर आता प्रकाश सुर्वेंनीही या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मी आजारी असल्याने याबद्दल काही बोललो नव्हतो, असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले आहे. (Latest Marathi News)
काय म्हणाले प्रकाश सुर्वे...
शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओमुळे सध्या राज्यातलं वातावरण तापलं आहे. म्हात्रे यांनी वारंवार माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. पण प्रकाश सुर्वे यांच्या मौनामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. आता सुर्वे यांनी आपली बाजू मांडली आहे.
आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये आपली तब्येत ठीक नसल्याने आपण बोललो नाही, असं सुर्वे यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, "मी गेल्या महिन्याच्या १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव वोकार्ड इस्पीतळामध्ये दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने व सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही असे चुकीचे अर्थ काढून अपप्रचार केल्या जात आहे. त्यामुळे मी हे विस्तृत निवेदन देत आहे."
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) कामाच्या धडाक्यामुळे राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीयो मोर्फकरणे खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करित आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच यामध्ये पुढे त्यांनी "प्रचंड गर्दीत आणि प्रचंड आवाजात मला बहिणी समान असणा-या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीयोमध्ये चुकीचे गाणे लावून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा व्हिडीयो सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला." असेही ते म्हणाले आहेत..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.