Baramati News: काळीज पिळवटून टाकणारी घटना! सांडपाण्याच्या चेंबरमध्ये गुदमरुन चौघांचा मृत्यू, तिघे एकाच घरातील; गावावर शोककळा

Crime News: मन हेलावून टाकणाऱ्या या दुर्देवी दुर्घटनेत बाप, लेक अन् चुलत्याचा मृत्यू झाला. एकाला वाचवायला गेले अन्....
Baramati News
Baramati NewsSaamtv
Published On

Crime News: वाहत्या सांडपाण्याच्या चेंबरमध्ये गुदमरुन चौघांचा मृत्यू झाल्याची दुखःद आणि दुर्देवी घटना समोर आली आहे. बारामती बारामती तालुक्यातील खांडज येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घटना घडली असून मृत झालेले तिघे एकाच कुटूंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Baramati News
Maharashtra Political Crisis: सरकार पडेल असं कृत्य राज्यपालांनी करायला नको होते; सरन्यायाधीशांचं महत्वाचं निरीक्षण

याबाबत अधिक माहिती अशी की, खांडज(ता.बारामती) येथे वाहत्या सांडपाण्याचा चेंबर साफ करताना एकाच कुटुंबातील तिघाजणांसह शेजारील एकाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. घटनेनंतर उपचारासाठी सर्वांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात आणण्यात आले. मात्र,तत्पुर्वीच या सर्वांची प्राणज्योत मालवली.

या दुर्देवी घटनेमध्ये साफ करण्यासाठी एकजण आतमध्ये उतरला होता. मात्र तो टाकीत अडकल्याने त्याच्या मदतीला इतर तिघे गेले आणि त्यांचाही यामध्ये दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Baramati News
Surekha Yadav : वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदाच महिलेच्या हाती; मराठमोळ्या लेकीचा ट्रेन चालवतानाचा VIDEO पाहाच

प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे, बापुराव लहुजी गव्हाणे अशी या चौघाजणांची नावे आहेत. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे. ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सिल्व्हर जुबिली रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. (Baramati )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com