Uddhav Thackeray Dasara Melava 2023  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Dasara Melava 2023: हिंमत असेल तर PM फंडपासून काश्मीरपर्यंतची चौकशी करा; उद्धव ठाकरेंचं सत्ताधाऱ्यांना ओपन चॅलेंज

Uddhav Thackeray Dasara Melava 2023: 'हिंमत असेल तर PM फंडपासून काश्मीरपर्यंतची चौकशी करा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं आहे.

Vishal Gangurde

Dasara Melava 2023:

ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत सुरु आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरी ते मराठा आंदोलनपर्यंत झालेल्या घडामोडींवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात केला. 'हिंमत असेल तर PM फंडपासून काश्मीरपर्यंतची चौकशी करा, असं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलं. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, 'मला घराणेशाही मान्य आहे. कोरोन काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी हे काम केलंय. त्यामुळे मी राज्याचा कुटुंब प्रमुख झालो. ज्यांच्या मागे पुढे कोणी नाही, त्यांच्या हातात देश दिला तर त्याचा जर्मन देशाप्रमाणे होतो'.

'नरेंद्र मोदी आल्यानंतर स्थैर्य येईल वाटलं होतं. पण आता काय चाललं आपण पाहताय. कोणाचेही प्रश्न सुटले नाहीत. उद्या सरकार आपलं येणार, आणणार म्हणजे आणणारच. त्रास देत थांबवलं नाही तर आमचं सरकार आल्यानंतर तुम्हालाही उलटं टांगणार', असे ठाकरे म्हणाले. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

'काही जणांना हनुमान चालीसाचा पेव फुटलं होतं. आता मणिपूरमध्ये जाऊन बोला. लोक सांगतात, जनतेत तुमच्या बाबतीत प्रेम आहे. ते प्रेम राज्याच्या हितासाठी सांभाळून ठेवा. सरकार आल्या-आल्या मेट्रो आणि बुलेट ट्रेनची जागा सांभाळली. ती लगेच देऊन टाकली, असे ठाकरे पुढे म्हणाले.

'बुलेट ट्रेन गद्दारांना सुरतला नेण्यासाठी सुरु करत आहेत. मुंबई तोडून दिल्लीच्या दरवाज्यात उभी करण्याचा डाव आहे. मुंबई तोडण्याचा प्रयत्न झाला तर तुमचं सरकार जाळून टाकेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

'हिंमत असेल तर पीएम फंडपासून काश्मीरपर्यंत चौकशी करा. आम्ही मुंबई वाचवल्याचा अभिमान बोलून दाखवत नाही. हे उलट मुंबईची बदनामी करत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

BEST Election: ठाकरे बंधूंच्या हाती भोपळा, BMC च्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे फेल

Brain Health: तल्लख बुद्धी हवी? तर मेंदूच्या आरोग्यासाठी आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT