Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray on Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray on Eknath Shinde : शिंदेंना ३ जिल्ह्यात कुणी ओळखत नव्हते, आता ३३ देशांत..; उद्धव ठाकरे खूप काही बोलून गेले

Satish Kengar

Uddhav Thackeray on Eknath Shinde : ''आज या गद्दारांची ३३ देशात गद्दार म्हणून ओळख झाली आहे. त्यावेळी त्यांना (एकनाथ शिंदे) महाराष्ट्रात ३ जिल्ह्यातही कोणी ओळखत नव्हतं मंत्री म्हणून'', अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी नाव न घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

उद्धव ठाकरे आज बारसूच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray on Narayan Rane : ''नारायण राणेंची सुक्ष्म जबाबदारी''

उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''हे सरकार कोसळणार आहे. शिंदे-भाजप सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत. नारायण राणेंची सुक्ष्म जबाबदारी वाढली आहे. प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तर हे सरकार पडणार.'' (Breaking Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, ''३७ आंदोलकांना तडीपार केले आहे. आधी नारायण राणे यांनी देखील रिफायनरीला विरोध केला आहे. प्रकल्प चांगला आहे तर मग पोलीस बळाचा वापर का करता.

तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, 'नाणार येथे प्रकल्प होऊ नये यासाठी तेथील ग्रामस्थांच्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यानंतर तो प्रकल्प तेथून घालवला. त्यावेळी माझी भूमिका स्पष्ट होती.''

ते म्हणाले, ''प्रकल्पाला विरोध किंवा समर्थन असं आम्ही काही ठरवलं नाही. जे स्थानिक प्रकल्पाच स्वागत करतात तिथे तो उभारला जाऊ शकतो. त्याचवेळी आशिष देशमुख यांच्याही बातम्या आल्या होत्या. आशिष देशमुख म्हणाले होते प्रकल्प आमच्याकडे द्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं त्यासाठी पाणी लागतं, तेव्हा ते म्हणाले होते आम्ही बाकी पाहतो.''

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आता जे लोक सुपाऱ्या घेऊन फिरतात. त्या गद्दार लोकांनी मला असं सांगितलं की, हा बारसूचा प्रकल्प आता जिथे होणार अशा चर्चा आहेत. या प्रकल्पाला तिकडच्या लोकांचा विरोध नाही, तिकडे बरीच जमिन निर्मनुष्य आहे.

ते म्हणाले, ''पर्यावरणाची हानी होणार नाही. हा प्रकल्प तिकडे आला तर चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल. त्याचबरोबर जो तुमचा नाणार वेळचा आक्षेप होता पर्यावरणाची हानी होईन, स्थानिकांचा विरोध येथे होणार नाही. त्यामुळे मी ते पत्र केंद्र सरकारला दिलं होतं.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News: कार्यक्रम आटोपून परतत असताना बोलेरोचा भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

Monsoon 2024 News: मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश

Horoscope 16 May : कुंभसह ४ राशींच्या लोकांसाठी गुरुवार ठरणार लकी

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

SCROLL FOR NEXT