Uddhav Thackeray News: 'वेदांता महाराष्ट्राला द्या आणि रिफायनरी... '; उद्धव ठाकरेंनी समस्येवर उपायच सांगितला

Uddhav Thackeray News: 'वेदांता महाराष्ट्राला द्या आणि रिफायरी तिकडे न्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना उपायच सांगितला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray saam tv
Published On

निवृत्ती बाबर

Uddhav Thackeray News: राज्यात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण चांगलंच तापलं आहे . त्यात आज रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बारसू प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लबोल केला आहे. 'वेदांता महाराष्ट्राला द्या आणि रिफायरी तिकडे न्या, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना उपायच सांगितला आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'गावांमध्ये स्वतः गेलेलो आहे, भूमिका स्पष्ट केलीच आहे. नानार येथे प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेना उतरली होती, तो तिथून प्रकल्प हलविला. आशिष देशमुख भेटले होते तेव्हा म्हटले होते की, आमच्याकडे द्या. मी पत्र केंद्राला पाठवलं होतं. चाचपणी सुरू केली होती. पण आज जसा आलोय, तसाच मुख्यमंत्री असताना आलो असतो'.

'प्रकल्प चांगला आहे तर लोकांना का भेटलं जात नाही. जर प्रकल्प चांगला असेल तर सुपारी बहाद्दर इथे का येत नाही? माझं प्रकल्पाविषयी पत्र नाचवलं जातंय, मग वेदांता बाहेर का गेलं. वेदांता प्रकल्पाला महाराष्ट्राला द्या आणि हा तिकडे घेऊन जा. आमची भूमिका एकच होती आणि आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'दडपशाही चालली आहे, त्यामध्ये नक्कीच काळबेरं आहे असं वाटतंय. प्रकल्पाबाबत जनमत चाचणी घेण्यासाठी त्यांनी इथं यावं लागेल ना, उपऱ्यांच भलं केल जातंय आणि कोकणवासीयांवर अन्याय केला जातोय. भूमीपुत्रांना जर न्याय जातोय, तर मोकळेपणाने पुढं का जात नाहीत. सॉईल टेस्टिंग आहे खरं आहेत, पण रिपोर्ट आला तर भूमीपुत्रांचं मत कुठे आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray on Eknath Shinde : शिंदेंना ३ जिल्ह्यात कुणी ओळखत नव्हते, आता ३३ देशांत..; उद्धव ठाकरे खूप काही बोलून गेले

'पत्रकारांना अडवलं जातंय ही मुस्कटदाबी आहे. तुम्ही देखील लोकशाहीचा स्तंभ आहेत. प्रकल्पाबाबत ते पावलं मागे घेतले नाही तर खुर्चीचे पाऊल ढासाळत हे सरकार कोसळेल, अशी टीका ठाकरे यांनी केली. यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर देखील निशाणा साधला. 'त्यांच्या डोक्यावर दोन मोठी ओझी आहेत, त्यांना ते काम करू द्या, अशी टीका ठाकरे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com