Sanjay Raut on Narayan Rane : बारसूवरून राजकारण पेटलं; संजय राऊतांचा राणे पिता- पुत्रांवर हल्लाबोल
Sanjay Raut on Uddhav Thackeray Barsu Visit : 'येऊ देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केली पाहिजे', असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राणे पिता- पुत्रांवर हल्लाबोल केला आहे.
अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंना पाय ठेवू देणार नाही, असं म्हटलं होतं. यातच आज उद्धव ठाकरे हे बारसू दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान माध्यमांशी बोलताना संजय राऊत असं म्हणाले आहेत.
Sanjay Raut : काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, ''शिवसेना आणि कोकणाचं एक नातं आहे. ठाकरे कुटुंब आणि कोकणाचं एक नातं आहे. जेव्हा कधी कोकणी माणसांवर हल्ला झाला, त्यावेळी शिवसेना तिथे त्यांच्या मदतीसाठी धावली आहे.'' (Breaking Marathi News)
Sanjay Raut Latest News : राणे पिता- पुत्रांवर टीका
ते म्हणाले, ''जे भांडवलदारांसोबत आहेत, ज्यांची तिथे गुंवणूक आहे, त्यांना त्याची भीती वाटते. म्हणून ते अशा धमकी देतात. याला येऊ देणार नाही. त्याला येऊ देणार नाही. संपूर्ण शिवसेना तिथे जागेवर आहे. मग का येऊ देणार नाही? आता उद्धव ठाकरे पोहोचतील. मग काय कराल तुम्ही? म्हणून अशा धमक्या देणं बंद करा.''
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

