Uddhav Thackeray Raj Thackeray saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत ठरलं, मविआ नाही तर ठाकरे बंधू एकत्र लढणार, राऊतांची घोषणा, काँग्रेसचे प्रत्युत्तर

ठाकरे बंधूंची युती मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आहे. ही युती इंडिया आघाडीचा भाग नाही, ही युती मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र रक्षणासाठी आहे, असे राऊत म्हणाले.

Namdeo Kumbhar

उद्धव आणि राज ठाकरे युतीची संजय राऊत यांनी पुष्टी केली

ही युती इंडिया आघाडीचा भाग नाही, फक्त मुंबई स्थानिक निवडणुकांसाठी

केंद्रबिंदू: मराठी भाषा, मराठी अस्मिता, महाराष्ट्र रक्षण

काँग्रेसकडून आक्षेप नसल्याची प्रतिक्रिया

मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा दावा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती इंडिया आघाडीचा भाग नाही, हा स्तानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयावर केंद्रीय स्तरावर चर्चा होत नाही. शिवसेना-मनसे एकत्र येण्याचा निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र घेतला आहे, आणि त्यासाठी ते समर्थ आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड असल्यामुळे या विषयावर चर्चा होत आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत, असे संजय राऊत म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीवर घणाघाती टीका केली. त्याशिवाय ठाकरे बंधू एकत्र असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्याकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चर्चा होते, मला असं वाटतं दोन प्रमुख लोक एकत्र येत असल्यामुळे इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही. दोन बंधू एकत्र येत असतील तर आक्षेप का येत असेल? मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सकपाळ इकडे काँग्रेसच्या महाराष्ट्रातील युनिट सुद्धा मराठीच्या प्रश्नावर भूमिका घेऊन उभी आहे. आम्ही राजकीयदृष्ट एकत्र आले आहोत, त्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस, महाराष्ट्राचे रक्षण हाच आहे, त्याच्यामध्ये वेगळा विषय काय आहे, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि मुंबई वाचण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायचं ठरवलं असेल तर मराठी जनतेला स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंद असेल. राज ठाकरे यांनी परप्रांतीच्या विरोधात कोणती भूमिका घेतली नाही, कधीकाळी शिवसेनेवरती आरोप होत होते, महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन सध्या बंगालमध्ये सुरू आहे, ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केले, तामिळनाडूमध्ये तेच आंदोलन सुरू आहे, मग तुम्ही महाराष्ट्रावर का आक्षेप घेत आहात? आम्ही मराठी बोलतो म्हणून आणि मराठी बोला असं सांगत आहोत म्हणून मराठी बोलणार नाही, असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात लोकांच्या रागाचा भडका उडतो आणि तो स्वाभाविक आहे, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे भूमिका घेतात, दोन भाऊ काय निर्णय घेतील. दोन्ही भावांना एकत्र येऊन द्या, अनेकांच्या पोटात वेदना होत आहेत, ते होऊ द्या.. ते एकत्र येणार हे ऐकूणच अनेकांची झोप उडाली आहे. पण आम्हाला तर आनंद झाला आहे. ते एकत्र आल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. आधी एकत्र येऊ द्या.
विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस नेते..

मविआ विधानसभेलाच, आता...

महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि आघाडी लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप कोणती आघाडी तयार झाली असेल तर मला सांगा. तुम्ही आतापर्यंत इतिहास प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाडी निर्माण होत असतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यात राजकीय पक्ष सुद्धा नसतात, त्याच्यामुळे त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या त्या जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते आणि त्यांना असतात. मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबई बाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT