समुद्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू  SaamTv
मुंबई/पुणे

समुद्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

वसईच्या सुरुची परिसरात रविवारी कुटुंबासह सहलीला गेलेल्या दोन मुलांचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन इंगळे

वसई : वसईच्या सुरुची परिसरात रविवारी कुटुंबासह सहलीला गेलेल्या दोन मुलांचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. वसई पोलिसांनी दोन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. Two young men drown in the sea

हे देखील पहा -

वसई पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी नालासोपारा येथील संतोष भुवन परिसरात राहणारे अजित महिपाल विश्वकर्मा (वय १३) व रणजीत शिवकुमार विश्वकर्मा (वय २०) हे आपल्या नातेवाईकांसोबत वसई पाचूबंदर येथील सुरुची बाग येथे सहलीला गेले होते. यावेळी नातेवाईकांसोबत असताना अचानक अजित आणी रणजीत हे दोघेही पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते.

पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात दूरवर गेले आणि बुडाले. दुपारी २ च्या सुमारास ते समुद्रात बुडाले असता पोलिसांनी शोध घेतला असता सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांचे मृतदेह किनाऱ्यावर तरंगताना आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सध्या सागरी किनारी कोरोनामुळे बंदी आदेश लागू केलेले आहेत. तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर पोलिसांनी रस्ते बंद केले असतानाही नागरिक आड मार्गाने सागरी किनारी जातात आणि अपघाताला बळी पडतात.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral : विजेच्या तारेला स्पर्श अन् डोक्याला ठिगणी पेटली, २ सेकंदात ट्रकचालकाचा मृत्यू; पाहा थरारक Video

Oily Skin: ऑयली स्कीनसाठी ट्राय करा 'हे' घरगुती फेस मास्क, चेहऱ्यावर येईल ग्लो

Shirdi Sai Baba Temple: साईबाबांच्या मूर्तीवरून पुन्हा वाद? हिंदू सेनेचे युवराज महाराज बरळले

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'ही' योगासने, आताच सवय लावून घ्या

Nana Patekar: तनुश्री दत्ताचा पुन्हा नानांवर आरोप; माझा छळ होतोय

SCROLL FOR NEXT